(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
Dashavatar: ‘दशावतार’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, रविवारी दुप्पट कमाईत मोडले रेकॉर्ड
‘सचिन पिळगांवकर मला सिनिअर’ – दिलीप प्रभावळकर
‘दशावतार’ चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलीप प्रभावळकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीबाबत माहिती दिली. तसेच त्यांना यावेळी एक खास प्रश्न विचारण्यात आला, “सचिन पिळगांवकर तुम्हाला सिनिअर आहेत का?” या प्रश्नावर दिलीप प्रभावळकर यांनी जे उत्तर दिले, ते खूपच प्रामाणिक आणि नम्रहोतं. ते म्हणाले, “हो! सचिन पिळगांवकर मला सिनिअर आहेत.” असे ऐकल्यानंतर सगळेच चकीत झाले.
दिलीप प्रभावळकर यांनी त्याचे कारणही सांगितले ते म्हणाले, “मी खूप उशिरा काम करायला सुरुवात केली. मला या क्षेत्रात येऊन साधारण ५० वर्षे झाली आहेत. पण, सचिन पिळगांवकर यांनी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून अगदी लहानपणापासूनच काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अभिनयाच्या बाबतीत ते माझ्यापेक्षा सिनिअरच आहेत.” असे ते म्हणाले. आणि त्यांच्या या प्रामाणिक उत्तराने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
‘संपूर्ण घरच त्यांच्या ताब्यात…’ अभिनेते किशोर कदम यांना बिल्डरकडून धोका? पोस्ट शेअर करत म्हणाले…
बॉक्स ऑफिसवर ‘दशावतार’चा धुमाकूळ
चित्रपट व्यापार विश्लेषक ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, ‘दशावतार’ने पहिल्या दिवशी ५८ लाख रुपयांचा व्यवसाय केला. पण, दुसऱ्या दिवशी, म्हणजेच शनिवारी, या कमाईने थेट कोटींचा टप्पा पार केला. चित्रपटाने १.३९ कोटी रुपये कमावले आहेत, ज्यामुळे फक्त दोन दिवसांतच जगभरात चित्रपटाची कमाई २.२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ‘माऊथ पब्लिसिटी’मुळे ‘दशावतार’ला प्रेक्षकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये हा चित्रपट अजून चांगली कमाई करण्याची शक्यता आहे.






