(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी अभिनेते आणि कवी किशोर कदम यांचं मुंबईतील राहत घर धोक्यात आले आहे. याआधी त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती शेअर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागून याबद्दल आवाज उठवला होता. सोसायटीत बिल्डर आणि कमिटीकडून सुरू असलेल्या फसवणूकीबाबत एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमधून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची विनंतीही केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी देखील त्या पोस्टची दखल देत तपास करण्याचे आदेश दिले होते. परंतु आता किशोर कदम यांनी बिल्डर आणि सोसायटी कमिटीकडून सुरू असलेल्या फसवणुकीबाबत आवाज तर उठवला पण यामुळे त्यांचं कुटुंब आणि घर दावणीला लागलं आहे.
आता किशोर कदम यांनी आणखी नवीन फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी बिल्डरच्या विरोधात आवाज उठवल्याने त्यांना त्रास दिला जात असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी लिहिले की, ‘१२.०९.२०२५ रोजी रात्री ८:५३ वाजता एक अनोळखी महिला सोसायटीत आली. तिने त्यांच्याबद्दल चौकशी केली आणि थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचली. महिलेनं दोनदा बेल आणि कडी वाजवली. त्यानंतर ती वरच्या मजल्यावर गेली, ३ मिनिटं थांबली आणि पुन्हा त्यांच्या दाराबाहेर आली. हे सगळं आमच्या दाराबाहेर असलेल्या CCTV मध्ये कैद झाले आहे.’ असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
Bigg Boss 19: ‘बिग बॉस १९’ मधील पहिले डबल एव्हिक्शन पडले महागात, एकावेळी दोन स्पर्धक घराबाहेर
आधीही केली होती टेहळणी
किशोर कदम यांच्या मते, हीच महिला यापूर्वीही दोन वेळा सोसायटीच्या आसपास आली होती आणि त्यांच्याबद्दल चौकशी करून गेली होती. सोसायटीचे CCTV फुटेजमध्येही ती दिसली असावी. आता ही महिला का आली आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितली ही संपूर्ण माहिती खाली दिलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
बिल्डरकडून सुरू आहे मानसिक त्रास?
किशोर कदम यांनी सांगितले की, “गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या श्री. तेजस शहा यांची मॅनेजजिंग कमिटीने कुठल्याही प्रकारची सखोल चौकशी न करता नियुक्ती केल्याच्या विरोधात आवाज उठवल्याने आता मला आणि माझ्या पत्नीला हा भावनिक मानसिक सामाजिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो आहे. वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवणे हे प्रत्येक जबाबदार नागरिकांचे कर्तव्य आहे. इथे तर माझे संपूर्ण घरच दावणीला लागले आहे. खरेतर सगळी तेवीस घरे मॅनेजिंग कमिटीने दावणीला लावली आहेत.”
Dashavatar: ‘दशावतार’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, रविवारी दुप्पट कमाईत मोडले रेकॉर्ड
कायदेशीर कारवाईची मागणी
किशोर कदम यांनी म्हटलं की, “अशा बेजबाबदार आणि बेबुर्वत कारभार करणाऱ्या मॅनेजिंग कमिटी विरोधात कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, जेणेकरून अशा प्रवृत्तीच्या भ्रष्ट कारभार करणाऱ्या कमीट्या ताळ्यावर येतील”. किशोर कदम यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत न्यायाची अपेक्षा केली आहे. त्यांनी पोस्टच्या शेवटी लिहिलंय, “माननीय फडणवीस साहेब..! आपण जो मला दिलासा दिलात त्याबद्दल मी आणि माझी पत्नी आपले खूप खूप आभारी आहोत. या प्रकरणाशी संबंधित सर्व शासकीय कार्यालयांच्या सहकार्याचे रूपांतर मला न्याय मिळवून देण्यात होईल अशी मी आशा व्यक्त करतो.”