(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
निमिषने लग्नात खास पारंपारिक लूक केला होता. त्याने केशरी रंगाचं धोतर आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तर त्याच्या पत्नीने केशरी रंगाची नऊवारी साडी नेसली होती. निमिषचा कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला आहे. निमिषच्या लग्नासाठी मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटिंनीही हजेरी लावली होती. निमिषच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोंवर करत चाहत्यांनी निमिषला शुभेच्छा देत आहेत. तर शिवाली परबने देखील या दोघांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. तिने या दोघांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.
निमिषचा काही महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. आता त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमुळे निमिषला प्रसिद्धी मिळाली आहे. काही मालिका आणि सिनेमांमध्येही ती झळकला आहे. याशिवाय काही नाटकांमध्येही त्याने काम केले आहे. निमिषची पत्नी कोमलचंही कलाविश्वाशी खास कनेक्शन आहे. ति मालिकांची क्रिएटिव्ह हेड म्हणून काम पाहते






