सिद्धार्थ जाधवचा भाऊ कोण आहे? काय आहे त्यांची ओळख?
दिलीप बने: डॉ. लवेश जाधव हे एक असामान्य व्यक्तिमत्व आहेत. मुंबई विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर, त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. ते केवळ रुग्णांचे शारीरिक दुखणे बरे करत नाहीत, तर त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करतात. ज्या रुग्णांना कोणी वाली नाही, त्यांचे ते वाली बनतात, आणि ज्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत, त्यांना ते आर्थिक मदत करतात. डॉ. लवेश जाधव हे केवळ डॉक्टरच नाहीत, तर एक देवमाणूस आहेत, ज्यांनी अनेक लोकांचे आयुष्य बदलून टाकले आहे.”
मराठी मध्ये गाजलेलं मोठं नाव म्हणजे आपला सिद्धू , ज्याने मराठी सिनेमा तसेच बॉलीवूड सिनेमात ही आपली मोठी छाप सोडली आहे. असा हा आपला सुपरस्टार सिद्धार्थ जाधव सगळ्यांनाच माहिती आहे. पण सिद्धार्थ जाधवचा मोठा भाऊ काय करतो कोणाला माहिती आहे का? चला तर मग माहिती करून घेऊया की सिद्धूचा मोठा भाऊ नक्की काय करतो?
सिद्धार्थ सुपरस्टार असला तरी, त्याच्या मोठ्या भावाची स्वतंत्र अशी वेगळी ओळख आहे. डॉ. लवेश जाधव हे सिद्धार्थचे मोठे भाऊ.लवेश जाधव यांच्या पर्सनल लाइफबद्दल फार कमी लोकांनाचा माहिती असेल… सिद्धार्थ साठी त्याचा मोठा भाऊ म्हणजे सर्वस्व आहे. त्याने या आधी ही म्हटले होते की, मला जेव्हा कधी हरल्यासारखं वाटलं, तर मी माझ्या भावाकडे जाऊन रडायचो. त्याचा शब्दाने मला धीर येयाचा.
डॉ.लवेश जाधव हे सिद्धार्थचे मोठे बंधू. डॉ.लवेश हीच त्यांनी स्वतःची एक वेगळी प्रतिमा तयार केली आहे. डॉ.लवेश लहानपणा पासूनच फार हुशार. नववीत शिकत असताना, भारताकडून जपानला जाण्याचा जागतिक शांतता परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली. डॉ लवेश त्या भाग्यवान चार मुलांपैकी एक होते, ज्यांची निवड देशभरातून झाली होती. मुंबई विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर, डॉ. लवेश जाधव यांनी गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला. ज्यांच्याजवळ नातेवाईक नसायचे, त्यांचे अर्ज भरणे असो, किंवा आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांवर स्वतः खर्च करून उपचार करणे असो, त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. म्हणूनच, डॉ. लवेश जाधव हे केवळ सिद्धार्थसाठीच नव्हे, तर समाजातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्थान आहेत.
त्यांचा कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते जैवइंधन प्रकल्पांवर सध्या काम करत आहेत. स्वतःच्या मेहनतीने मीरा क्लिनफुएल्स लिमिटेड MCL” या कंपनीची स्थापना केली. जगातला सर्वात साधा आणि सरळ माणूस अशी सिद्धार्थ त्यांची ओळख करून देतो.