(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील वीण दोघातली ही तुटेना या मालिकेत सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गोव्यात झालेल्या धमाकेदार लग्नसोहळ्यानंतर, स्वानंदी- समर आणि अधिरा – रोहनचा पहिलावहिला सण साजरा होत आहे. पहिली संक्रांत म्हंटल कि उत्साह वेगळाच असतो. पण इथे अधिरा- रोहनच्या नात्यात मध्ये दुरावा आला आहे आणि जी अधिरा नेहमी सगळ्या गोष्टी करण्यात उत्साहीत असायची ती आपल्या लग्नानंतरचा पहिला सण साजरा करण्यासाठी उत्साही दिसत नाही, म्हणूनच समर- स्वानंदी ठरवतात कि अधिरा – रोहन मधला दुरावा या संक्रांतीला मिटवुया पण काकूला हे काही पटत नाहीये.
तर दुसरीकडे अंशुमनने रोहनचा अपघात करण्याची सुपारी दिली आहे. घरात सगळे कार्यक्रमासाठी रोहनची वाट बघतायत. रोहन आला नाही म्हणून काकू तो येणारच नाही यावरून अर्पिता, अधिराला टोमणे मारते. पण तितक्यात स्वानंदी -रोहनला घेऊन येते. एका मोठ्या अपघातातून रोहन सुखरूप बाहेर पडून घरी येतो आणि संक्रांतीची पूजा पार पडते. पूजेच्या ठिकाणी रोहनची आई रोहनच्या अपघाताचा विषय घेऊन गोंधळ घालते.
या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारे सुबोध भावे, तेजश्री प्रधान आणि अन्य सहकलाकार यांनी आपल्या सहज अभिनयाने सर्व प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत. स्वानंदी आणि समरची भूमिका साकार करणाऱ्या तेजश्री आणि सुबोधची केमिस्ट्री कमाल असून प्रेक्षकांना फारच आवडत आहे. या मालिकेतील सतत येणारे ट्विस्ट आणि टर्न, गांभीर्य, मस्करी आणि सहजता याचा उत्तम मेळ ही मालिका असल्याचे दिसून येत आहे.






