(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूडमधील ड्रामा क्वीन राखी सावंतचा वाढदिवस २५ नोव्हेंबर रोजी होता, पण तिने दुसऱ्याच दिवशी स्वतःचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. तिने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ आता सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांसह पोस्ट केले आहेत. ते पाहून ती खूप आनंदी असल्याचे दिसून आले आहे. तिला लाखो रुपयांची बॅग देखील गिफ्ट म्हणून मिळाली आहे. परंतु, वापरकर्त्यांना खात्री पटत नाही आहे की तिला खरचं एवढी लाखोंची बॅग गिफ्ट म्हणून मिळाली आहे.
राखीने वाढदिवशी जोरदार डान्स केला
राखी सावंतने तिच्या मैत्रिणींसोबत केक कापला, ज्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर तिने बिग बॉस १८ फेम हेमा शर्मासोबत “परदेसिया” या गाण्यावर नृत्य केले. या गाण्याने राखी सावंतला अनेक वर्षांपूर्वी आयटम डान्सर म्हणून लोकप्रिय केले होते. यांचं गाण्यावर राखी पुन्हा एकदा थिरकताना दिसली आहे. सोबतच चाहते आता हा व्हिडीओ पाहून चांगला प्रतिसाद देत आहेत.
जवळच्या मित्राने लाखो रुपयांची बॅग दिली गिफ्ट
राखी सावंतने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये एका पुरूषाने तिला लाखो रुपयांची आलिशान बॅग भेट दिली. परंतु, अनेक युजर्सनी “ही बनावट आहे” अशी टिप्पणी केली. दुसऱ्या युजरने लिहिले, “या बॅगची पहिली कॉपी दुबईमध्ये उपलब्ध आहे.” असे लिहून अनेक चाहत्यांनी त्यावर कंमेंट करून आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत.
‘हम उनको बताएंगे…’ PAK मध्ये रणवीरच्या ‘धुरंधर’चा डंका! ट्रेलर पाहून लोकांनी दिल्या प्रतिक्रिया
राखी सावंतबदल बोलायचं झालं तर, राखी ही बॉलीवूड इंडस्ट्रीमधील एक बिनधास्त व्यक्तिमत्व आहे. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसली आहे. आणि त्यामुळे ती अडचणीत आली आहे. राखीने तिच्या करिअरची सुरुवात रक डान्सर म्हणून केली आहे. तिने अनेक हिंदी, मराठी इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. राखीने नेहमीच आपल्या अभिनयकौशल्याने लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे.






