(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आदित्य धर दिग्दर्शित “धुरंधर” या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे हा चित्रपट १७ वर्षांचा विक्रम मोडणार असल्याचे दिसून येत आहे. चित्रपटाचा रनटाइम आता दोन ते तीन तासांपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे. हा चित्रपट आता पुन्हा एकदा एक नवा रेकॉर्ड बनवणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात चित्रपट नक्की किती तासांचा असणार आहे.
हा चित्रपट इतक्या तासांचा असेल
बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, “धुरंधर” हा चित्रपट अंदाजे ३ तास ३२ मिनिटे लांब असल्याचे म्हटले जात आहे. अहवालात म्हटले आहे की, “सध्या अंतिम प्रदर्शनाची वेळ पुढे ढकलली आहे. परंतु, तो अंदाजे ३.५ तासांचा असण्याची अपेक्षा आहे. सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सीबीएफसीने चित्रपटाला मान्यता दिल्यानंतर काही दिवसांत नेमका प्रदर्शनाचा वेळ कळेल.”हा चित्रपट आता नवीन रेकॉर्ड बनवण्यासाठी सज्ज झाला आहे.
बॉलीवूड Drama Queen चा मोठ्या उत्साहात ४७ वा वाढदिवस साजरा, जवळच्या व्यक्तीने दिले मोठे सरप्राईज
चित्रपट मोठा बनवण्यामागचे कारण काय?
पुढे असे म्हटले होते की “धुरंधर” हा चित्रपट एका दीर्घ कथेवर आधारित आहे. म्हणूनच त्याचा कालावधी मोठा असण्याची शक्यता आहे. “उरी: द सर्जिकल स्ट्राईक” आणि “आर्टिकल ३७०” सारख्या चित्रपटांचा हवाला देत, वृत्तांतात असे म्हटले आहे की “धुरंधर” ची कथा शेवटपर्यंत आकर्षक असणार आहे. असेही वृत्त आहे की “धुरंधर” दोन भागात प्रदर्शित केला जाणार आहे. जे जाणून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
चित्रपटाने १७ वर्षांचा इतिहास मोडला
ही माहिती खरी ठरल्यास, “धुरंधर” हा जवळजवळ १७ वर्षांत प्रदर्शित झालेल्या सर्वात जास्त काळ चालणाऱ्या बॉलीवूड चित्रपटांपैकी एक बनणार आहे. यादीतील शेवटचा चित्रपट “जोधा अकबर” आहे, जो २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचा रनटाइम ३ तास ३४ मिनिटे होता. तसेच काही चित्रपट पुढील प्रमाणे..
सर्वाधिक काळ चाललेले पाच चित्रपट
‘धुरंधर’ कधी होणार प्रदर्शित?
आदित्य धर लिखित आणि दिग्दर्शित ‘धुरंधर’ मध्ये एक मजबूत स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘धुरंधर’ ५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा एक स्पाय-थ्रिलर ॲक्शन चित्रपट असणार आहे.






