(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
“नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. “नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटाची गाणी, टीजर, ट्रेलरला प्रचंड चाहत्यांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यात आता या चित्रपटाला अनोखा मान मिळाला आहे. हा चित्रपट आता सुप्रसिद्ध अशा पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर झळकत असून याची चर्चा चांगलीच रंगली आहे. “नवरा माझा नवसाचा 2” हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.
“नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे तर अभिनेता स्वप्नील जोशी ही जोडी सचिन-सुप्रिया यांच्या मुलगी-जावई अशा भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. हा टीजर लाँच झाल्याबरोबरच चाहत्यांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. हा चित्रपट नक्कीच ब्लॉकब्लस्टर होणार अशी चाहत्यांची इच्छा आहे.
“नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाची निर्मिती
सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेने केली आहे. चित्रपटाची कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे.
हे देखील वाचा- BIGG BOSS Marathi : आर्याला रितेश देशमुख देणार काय शिक्षा, काढणार घराबाहेर?
“नवरा माझा नवसाचा” हा चित्रपट आजही प्रेक्षकांना आवडतो. त्यामुळे आता “नवरा माझा नवसाचा 2” मध्ये काय धमाल अनुभवायला मिळणार याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. या टीजर मधून चित्रपटाच्या कथानकाविषयी थोडासा अंदाज बांधण्यात येत असून ८० कोटीचे हिरे आता ८०० कोटीचे झाले आहेत. त्यामुळे हा मनोरंजक प्रवास अनुभवण्यासाठी आता प्रेक्षकांना केवळ २० सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.