(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
“नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे तर अभिनेता स्वप्नील जोशी ही जोडी सचिन-सुप्रिया यांच्या मुलगी-जावई अशा भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. हा टीजर लाँच झाल्याबरोबरच चाहत्यांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. हा चित्रपट नक्कीच ब्लॉकब्लस्टर होणार अशी चाहत्यांची इच्छा आहे.
“नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाची निर्मिती
सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेने केली आहे. चित्रपटाची कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे.
“नवरा माझा नवसाचा” हा चित्रपट आजही प्रेक्षकांना आवडतो. त्यामुळे आता “नवरा माझा नवसाचा 2” मध्ये काय धमाल अनुभवायला मिळणार याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. या टीजर मधून चित्रपटाच्या कथानकाविषयी थोडासा अंदाज बांधण्यात येत असून ८० कोटीचे हिरे आता ८०० कोटीचे झाले आहेत. त्यामुळे हा मनोरंजक प्रवास अनुभवण्यासाठी आता प्रेक्षकांना केवळ २० सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हे देखील वाचा- मराठी महोत्सवात गाजलेला ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज!
टीजरला चाहत्यांना मिळाला प्रतिसाद
“नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाचा आजच टीजर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. तसेच हा टीजर पाहून चाहत्यांनी चांगला प्रतिसाद देखील दिला आहे. एका युजरने लिहिले की, ‘हा चित्रपट नक्कीच १०० कोटी क्रॉस करणार.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘सचिन सर आणि अशोक मामा …..सुपरहिट जोडी’ तर अनेक चाहत्यांनी ‘आता ट्रेलर लवकर रिलीज करा’ असं देखील लिहिले आहे. चाहत्यांना टीजर तर जास्तच आवडला आहे तसेच ट्रेलर देखील रिलीज झाले की तोही नक्की आवडेल. “नवरा माझा नवसाचा 2” हा चित्रपट २० सप्टेंबर सर्वत्र प्रदर्शित होणार आहे तर चाहत्यांना फक्त काही दिवसच या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे.