(फोटो सौजन्य - Instagram)
‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वातील विजेता सुरज चव्हाण हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. त्याला बिग बॉस मराठीमुळे खूप प्रसिद्धी मिळाली आणि तो घराघरात पोहोचला. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या अंतिम फेरीत जेव्हा सूरज चव्हाण विजेता ठरला तेव्हा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘झापुक झुपूक’ सिनेमाची घोषणा केली आणि या चित्रपटामध्ये सूरज मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले. सूरज चव्हाणचा हा सिनेमा २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झाला. परंतु या चित्रपटाला प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि हा सिनेमा फ्लॉप झाला. अशातच आता सूरज चव्हाण त्याच्या नवनवीन व्हिडीओमुळे चर्चेत येत आहे. लोकांचे त्याला भरपूर प्रेम मिळत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचा चाहता वर सध्या वाढतच आहे. अभिनेत्याला आता याचदरम्यान स्वर्गीय शाहीर दादा कोंडके यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार सूरजच्या हाती पडला. या सोहळ्याला त्याची बिग बॉस सहस्पर्धक जान्हवी किल्लेकर देखील उपस्थित होती. अभिनेत्याने हा आनंदाचा क्षण साजरा करून चाहत्यांचे आभार मानले आहे. सूरजने आपल्या इन्स्टाग्रामवर पुरस्कार सोहळ्याचे फोटो शेअर करत. “तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मला दादा कोंडके यांच्या नावाने पुरस्कार मिळाला, लय भारी वाटतंय!” असे म्हणून चाहत्यांचे आभार मानले आहे.
दीपिका कक्करवर होणार आज शस्त्रक्रिया, पती शोएब इब्राहिमने चाहत्यांकडे केली खास विनंती!
‘झापुक झुपूक’ सिनेमातून सूरजने प्रसिद्धी मिळावल्यानंतर चाहते आता अभिनेत्याचं भरभरून कौतुक करत आहे. टिकटॉक व्हिडीओमधून चर्चेत आलेल्या सूरजला सुरुवातीला अनेक संकटांना सामना करावा लागला तेव्हा कुठे तो आता प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. मात्र, बिग बॉस शोमध्ये त्याच्या साध्या आणि निरागस स्वभावामुळे प्रेक्षक त्याच्यावर प्रेम करायला लागले आणि तो थेट विजेता ठरला. आता या यशानंतर आणि हा मोठा पुरस्कार जिंकल्यानंतर आता सुरज कोणकोणते नवनवीन प्रोजेक्ट आणि कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.