(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ बोडकेच्या कारकिर्दीत नुकताच एक खास प्रसंग आला आहे. नाटक, टीव्ही मालिकांमधून ओळख मिळवणारा सिद्धार्थ आता सिनेमातही दमदार भूमिका साकारत आहे.अलीकडेच त्याचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा प्रदर्शित झाला असून, त्यात सिद्धार्थने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे. या भूमिकेतील त्याच्या अभिनयाचे कौतुक फक्त प्रेक्षकांनाच नाही, तर त्याच्या जवळच्या खास व्यक्तींकडूनही करण्यात आले आहे, ज्यामुळे हा क्षण सिद्धार्थसाठी अत्यंत खास ठरला आहे.
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमात शेतकरी आत्महत्या हा गंभीर विषय मांडण्यात आला आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी साक्षात छत्रपती शिवाजी महाराज अवतरले असल्याचं सिनेमातून पाहायला मिळत आहे.सिनेमातील सिद्धार्थ बोडकेची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांसमोर विशेष ठरली आहे.
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमातील सिद्धार्थ बोडकेची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पाहून त्याची पत्नी आणि अभिनेत्री तितीक्षा तावडे भावूक झाली.सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तितीक्षा सिद्धार्थला मिठी मारून रडताना दिसत आहे. तिच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत आहेत. सिद्धार्थच्या दमदार अभिनयाने तितीक्षा भारावून गेली असून, प्रेक्षकही तिच्या भावनिक प्रतिक्रियेने प्रभावित होत आहेत.सिद्धार्थच्या कामाचं कौतुक करीत ती मला तुझा अभिमान असल्याचं बोलताना या व्हिडीओमधून दिसत आहे.इतकंच नव्हे, तर सिद्धार्थचे सासरेही त्याचं अभिनय पाहून आनंद व्यक्त करत त्याचं मनापासून कौतुक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि प्रेक्षकांमध्येही मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडी सिद्धार्थ बोडके आणि तितीक्षा तावडे कायमच एकमेकांच्या कामाचं कौतुक करत आली आहे. नुकताच सिद्धार्थच्या अभिनयाने तितीक्षाला भारावून टाकलं असून, त्याचं कौतुक करताना तिला अश्रू अनावर झाले. हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांनी या भावनिक क्षणावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.






