(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
टीव्ही विश्वातील लोकप्रिय जोडी ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले यांच्या नात्यात दुरावा आल्याचे समोर येत आहे. मालिकेच्या सेटवरच त्यांचा नातं सुरू झालं आणि 3 मार्च 2024 रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकली होती. मात्र, लग्नानंतर फक्त दीड वर्षांतच या दोघांचा संसार मोडल्याचं म्हटलं जातंय.
सोशल मीडियावर आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये यांच्या घटस्फोटाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. अश्या चर्चा होण्याचे कारण म्हणजे योगिता आणि सौरभने इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांच्या लग्नाने फोटो डिलिट केले आहेत.तसेच एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलोदेखील केले आहे. त्यांचे फक्त ग्रुप फोटो, जुने रिल्स आणि त्यांच्या मुलाखती सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. तर गेल्या काही महिन्यांपासून या दोघांचे एकत्र फोटो पाहायला मिळत नाहीयेत. अलिकडेच दिवाळीनिमित्ताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सौरभने एकट्याचेच फोटो पोस्ट केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते गेल्या काही महिन्यांपासून एकत्र राहत नसल्याचे समजते आहे. अद्याप या जोडप्याने या चर्चेवर अधिकृत विधान केलेले नाही.
Kantara Chapter 1 Collection: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर कांताराने मारली बाजी! ₹852 कोटींची जागतिक कमाई…
योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी बालीला गेले होते. मात्र, त्या ट्रिपमधील त्यांनी शेअर केलेले रोमँटिक फोटो आता त्यांच्या इन्स्टाग्रामवर दिसत नाहीत. या ट्रिपदरम्यानचे फक्त योगिताचे एकटे फोटो आणि व्हिडिओ तिच्या अकाऊंटवर आहेत, तसेच सौरभच्या अकाऊंटवरही फक्त त्याचेच एकटे फोटो दिसत आहेत. त्यांच्या ‘जीव माझा गुंतला’ मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे काही एकत्र पोस्ट अजूनही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत, पण एकमेकांसाठी केलेले रोमँटिक पोस्ट इन्स्टाग्रामवरून गायब झाले आहेत.






