(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अवधूत गुप्ते हा नेहमी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर सक्रिय असल्याचे बघायला मिळतो, तो नेहमी काही ना काही त्याच्या अकाउंटवर पोस्ट करत असतो. त्याने नुकतीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. यात त्याने त्याच्या बोरिवलीच्या श्रीकृष्ण नगर परिसरातील वस्तुस्थिती सांगितली आहे. अवधूत गुप्तेने शेअर केलेली ही पोस्ट बघून लोकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. अवधूत गुप्तेने अंगावर काटा आणणाऱ्या फोटोंसह श्रीकृष्ण नगर परिसरातील वस्तुस्थिती सांगितली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटामागील काय आहे सत्य? प्रल्हाद कक्कर यांनी केला खुलासा
काय आहे अवधूत गुप्तेची पोस्ट?
मुंबईतल्या घरांमध्ये भिंतीवर ‘पाल‘ दिसली तरी शेजार पाजाऱ्यांना बोलवून “ऐऽऽ!! ऊऽऽ!!” चा दंगा करणाऱ्यांनी आमच्या बोरिवलीच्या श्रीकृष्ण नगर परिसरामध्य गेल्या दोन दिवसात मिळालेले हे दोन अजगर नक्की पहावेत! माकडांबरोबर तर आमचे सहजीवनच. परंतु, कधी बिबट्या तर कधी अजगरासारखा पाहुणा आमच्या कॉलनीमध्ये आला, की कृष्णनगर वासियांचा उत्साह हा अक्षरशः सण-सोहळ्यासारखा असतो! अर्थात आमच्यावर संस्कारच निसर्ग प्रेमाचे. ते आमच्या घरात येत नसून, आम्हीच त्यांच्या घरात घर बांधले आहे ह्याची जाणीव प्रत्येक नगरवासीयाला कायम असते.
Dashavatar: ‘दशावतार’ला मंगळवारच्या ९९ तिकिटांचा चांगलाच लाभ, कमाईचा आकडा आणखी वाढला
ह्या दोन अजगरांना देखील सर्पप्रेमींच्या मदतीने त्यांच्या इष्ट स्थळी पुनश्च पोहोचवण्यात आले. ही पोस्ट कुठल्याही वन अधिकाऱ्याने किंवा वनविभागाने कुठलीही कारवाई करावी यासाठी नसून, आमच्या कृष्णनगराचे कौतुक करण्यासाठी आहे. त्याचप्रमाणे कृष्ण नगर आणि आजूबाजूच्या परिसरात नव्याने विस्थापित होणाऱ्या नव्या शेजाऱ्यांचे स्वागत करत असतानाच त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यासाठी आहे. जय श्री कृष्ण नगर!! जय बोरिवली पूर्व!! अशी पोस्ट अवधूतने केल्या नंतर त्याच्या काही चाहत्यांनी बाप रे.. वगैरीच्या कमेंट केल्या असून काहींनी खूप मस्त..अश्या कमेंट केल्या आहेत
जी मंडळी पाल बघून घाबरतात त्यांनी बोरिवलीच्या श्रीकृष्ण नगर परिसरामध्य गेल्या दोन दिवसात मिळालेले हे दोन अजगर नक्की पहावेत! असंही त्याने म्हटलं आहे. कधी बिबट्या तर कधी अजगरासारखा पाहुणा आमच्या कॉलनीमध्ये येत असतो असंही त्याने सांगितले आहे. असे पाहुणे आल्यानंतर कृष्णनगर वासियांचा उत्साह हा अक्षरशः सण-सोहळ्यासारखा असतो! असं अवधूत गुप्तेनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.