‘Mismatched Season 2’ मालिकेतील मुख्य अभिनेता रोहित सराफ म्हणाला, “आम्ही शेवटी तारीख जाहीर केली याचा मला खूप आनंद आहे. सीझन 1 चे शूटिंग मजेदार होते परंतु सीझन 2 चे शूटिंग माझ्यासाठी अधिक अर्थपूर्ण होते कारण मला माहित होते की प्रेक्षकांना ते हवे आहे. मिसमॅच्डला गेल्या 2 वर्षात खूप प्रेम मिळाले आहे त्यामुळे मी सीझन 2 पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.”
रोहित सराफ, प्राजक्ता कोळी, रणविजय सिन्हा, विद्या मालवदे सीझन 2, 14 ऑक्टोबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. रोहित सराफ सध्या त्याचा आगामी चित्रपट विक्रम वेधाचे प्रमोशन करत आहे.