(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
2000 च्या दशकात एमटीव्ही हा प्रत्येक घरात संगीत ऐकण्यासाठी अत्यंत लोकप्रिय चॅनल होता. लोक आवडते गाणे पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी खास एमटीव्ही पाहायचे. मात्र, आता तो सोनेरी काळ संपत चालला आहे. एमटीव्हीची मूळ कंपनी पॅरामाउंट ग्लोबलने घोषणा केली आहे की, 2025 च्या अखेरीस ती आपल्या यूकेतील पाच प्रसिद्ध म्युझिक-फोकस्ड चॅनल्स बंद करणार आहे. यामध्ये एमटीव्ही म्युझिक, क्लब एमटीव्ही, एमटीव्ही 90s, एमटीव्ही 80s आणि एमटीव्ही लाईव्ह यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या चॅनल्सशी जोडले गेलेले प्रेक्षक निराश झाले आहेत.
या बातमीनंतर सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवण्यात आल्या की, एमटीव्ही पूर्णपणे बंद होणार आहे. मात्र, ही बाब खरी नाही. एका मुलाखतीत बोलताना माजी एमटीव्ही व्हीजे सिमोन एंजेल यांनी सांगितलं की, “हे ऐकून खूप वाईट वाटलं. एमटीव्ही हे एक असं स्थान होतं, जिथे संगीत, कलाकार आणि प्रेक्षक एकत्र यायचे. आता हे सगळं बंद होणार हे समजल्यावर खरंच मन तुटलं.”
जगप्रसिद्ध एमटीवी आपल्या पाच लोकप्रिय यूके चॅनल्स, एमटीवी म्युझिक, एमटीवी 80s, एमटीवी 90s, क्लब एमटीवी आणि एमटीवी लाइव यांना 31 डिसेंबर 2025 पासून बंद करणार आहे. या निर्णयाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर गोंधळ उडाला आणि अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की, “एमटीवी पूर्णपणे बंद होणार का?” काही युजर्सनी दु:ख व्यक्त करत म्हटलं की, “एमटीव्ही आता सर्व चॅनल्स बंद करणार आहे, हे खूपच दु:खद आहे.” मात्र, या सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, एमटीव्हीचा मुख्य चॅनल एमटीव्ही HD पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे आणि त्याच्या प्रसारणावर कोणताही परिणाम होणार नाही.
एमटीव्हीची मूळ कंपनी पॅरामाउंट ग्लोबल सध्या खर्चात मोठी कपात करण्याच्या रणनीतीवर काम करत आहे. याचाच भाग म्हणून, ऑस्ट्रेलिया, पोलंड, फ्रान्स आणि ब्राझील यांसह अनेक देशांमधील एमटीव्हीचे संगीत चॅनल्सही बंद केले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पॅरामाउंट जवळपास ५०० मिलियन डॉलर्सची बचत करण्याच्या योजनेवर आहे. याआधीही कंपनीने ऑगस्ट महिन्यात ‘जॅक रयान’ आणि ‘द स्पायडरविक क्रॉनिकल्स’सारख्या प्रसिद्ध सिरीज बनवणारे टेलिव्हिजन स्टुडिओ बंद केले होते.
Lakshmi Niwas: हनीमूनचं निमित्त, पण गोव्यात उलगडणार मोठं गुपित;‘लक्ष्मी निवास’मालिकेत नवा ट्विस्ट
यूकेमध्ये एमटीव्हीच्या स्थानिक प्रॉडक्शनवर बजेट कपातीनं परिणाम झाला असून, यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आणि ‘गोंझो’ व ‘फ्रेश आउट यूके’ सारखे लोकप्रिय कार्यक्रमही बंद करण्यात आले. तरीही, एमटीव्हीच्या संगीत चॅनल्सची लोकप्रियता संपलेली नव्हती.
फारसा बॉलिवूडमध्ये दिसत नसला तरी, 1200 कोटींचा मालक! विवेक ओबेरॉयने स्वतः सांगितला सक्सेस मंत्र…
एमटीव्हीची सुरुवात 1981 मध्ये अमेरिकेत झाली होती आणि याने म्युझिक व्हिडिओंच्या माध्यमातून संपूर्ण जगभरातील संगीतप्रेमींच्या सवयी बदलून टाकल्या. ‘Video Killed The Radio Star’ हे The Buggles या बँडचं गाणं या चॅनलवर पहिल्यांदा प्रसारित झालं होतं. 1987 मध्ये युरोपात पदार्पण केल्यानंतर, 1997 मध्ये यूकेसाठी स्वतंत्र एमटीव्ही चॅनल लाँच करण्यात आला होता.