international womens day 2025 vishakha subhedar advice to women drivers
‘शुभविवाह’ फेम विशाखा सुभेदार ह्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये घर निर्माण केले आहे. मालिका, नाटक आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या विशाखा सुभेदार सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी नुकतीच नवी कोरी अलिशान दुसरी कार खरेदी केली आहे. पहिली नॅनो आणि आता अभिनेत्रीने दुसरी नेक्सॉन अलिशान कार खरेदी केली आहे. अभिनेत्रीने ही ‘गुड न्यूज’ चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
मोकळे केस, माथ्यावर टिकली अन्…; महिला दिनी सोनाक्षी सिन्हाचा ‘जटाधारा’ चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज
अभिनेत्रीने नुकतंच काही तासांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने तिचा कार चालवतानाचा एक अनुभव शेअर केला आहे. आज महिला दिन आहे. महिला दिनाचे औचित्य साधत अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे. कार चालवतानाचा अनुभव अभिनेत्रीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत सांगितला आहे.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री म्हणते, “लेडी ड्रायव्हर म्हटल्यावर लोकं हलक्यात घेतात. तसंच त्यांचा अहंकारही दुखावतो. ही काय मला क्रॉस करणार असं त्यांचं होतं. एकदा मी शूटिंगला जात होते. माझ्यामागे एक स्कॉर्पिओ होती. आणि माझी नॅनो होती. तर माझ्या नॅनोने स्कॉर्पिओला ओव्हरटेक केलं. त्यात महिला ड्रायव्हर आहे म्हटल्यावर त्याचा अहंकार इतका दुखावला. ही कशी काय मला ओव्हरटेक करू शकते, असं त्याचं झालं. त्यानंतर त्याने पुढे जाऊन मला ओव्हरटेक केलं. कट वगैरे मारून तो पुढे जाऊन जिंकल्यासारख्या अविर्भावात एका सिग्नलला जाऊन थांबला. मी पुढे जाऊन काच खाली केली आणि त्याला म्हटलं की मला थोडं बोलायचं आहे. मी म्हटलं अरे तुम्ही अजून इथेच आहात. मला वाटलं तुम्ही आईच्या गावात पोहोचला असाल. चलाते राहो, आगे बढते राहो..”
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन दिलंय की, “Steering wheel समोर बसणं हे passion आणि जबाबदारीचं काम आहे. ते आपण स्त्रिया नक्कीच करू शकतो! चलाते राहो, आगे बढते राहो… जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा!” अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून चाहत्यांकडून अभिनेत्रीवर महिला दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.