(फोटो सौजन्य - Instagram)
एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि टिक टॉक स्टारची हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानची सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सर सना युसूफ आता आपल्यात नाही. फक्त १७ वर्षाची असलेल्या या सना युसूफची तिच्या घरात घुसून हत्या करण्यात अली आहे. सना युसूफ पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथील रहिवासी होती. तिचे इंस्टाग्रामवर ४९६ हजार फॉलोअर्स आहेत आणि तिला अजून जास्त यश आणि प्रसिद्धी मिळाली नव्हती. तथापि, तिच्याशी असलेले वैर काढून कोणीतरी तिचा जीव घेतला. इन्फ्लुएन्सरच्या घरात नातेवाईक म्हणून प्रवेश करून तिची हत्या करण्यात आली आहे. आता ही हत्या कोणी केली आणि का केली हे अजूनही स्पष्ट झालेले नाही आहे.
सना युसूफवर केला गोळीबार
इन्फ्लुएन्सर सना युसूफची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सना युसूफची हत्या करणारा कोण आहे हे अद्याप कळलेले नाही? वृत्तानुसार, हल्लेखोर कथितपणे सनाच्या घरात पाहुणा म्हणून घुसला होता आणि तिला गोळी मारून घटनास्थळावरून पळून गेला आहे. असे सांगितले जात आहे की सना युसूफला २ गोळ्या लागताच तिचा मृत्यू झाला. यानंतर, सनाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ येथे नेण्यात आला आहे.
गोळी झाडून खुनी गेला पळून
आता तिच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम सुरू झाले आहे. सध्या सना युसूफच्या खुन्याला अटक करण्यात आलेली नाही. तसेच, या हत्येमागील हेतू काय होता हे स्पष्ट झालेले नाही? सध्या पोलिस या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा तपास करत आहेत. असे सांगितले जात आहे की हे प्रकरण ऑनर किलिंगचे देखील असू शकते. त्याच वेळी, आतापर्यंत सना युसूफच्या कुटुंबाने या हत्येबाबत कोणतेही विधान दिलेले नाही. त्याच वेळी, ही बातमी ऐकल्यानंतर सना युसूफच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सना युसूफने तिच्या वाढदिवसाचा सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्या पोस्टला अजून २४ तासही झाले नाहीत.
IPL समारोप समारंभात शंकर महादेवन यांचे भारतीय सशस्त्र दलासाठी खास सादरीकरण, मुलंदेखील देणार साथ!
मृत्यूच्या काही तास आधी वाढदिवसाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता
वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर लगेचच तिच्या हत्येची बातमी समोर आली आहे. आता चाहते सना युसूफच्या शेवटच्या व्हिडिओवर दुःख व्यक्त करताना दिसत आहेत. काही जण तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करत आहेत, तर काही जण १७ वर्षांच्या निष्पाप मुलीच्या मारेकऱ्याला शिव्याशाप देत आहेत. काही लोक आता पाकिस्तानला असुरक्षित देश म्हणतानाही दिसत आहेत. सना युसूफचे चाहते यावेळी धक्क्यात आहेत आणि त्यांना या दुःखद बातमीवर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे.