बॉलिवूड हॉलीवूड नव्हे तर संपूर्ण जगात आपल्या अभिनयासाठी ओळखली जाणारी अष्टपैलू अभिनेत्री प्रियंका चोप्राचा (Priyanaka Chopra) आज ४० वा वाढदिवस आहे. चाळीशीमध्ये येऊनही आज ती तितकीच फिट आणि कामासाठी ˈपॅशनेट् आहे. आज तिच्या वाढदिवसाबद्दल जाणून घेऊया एक सामान्य मुलगी ते इंटरनॅशनल आयकॅान बनण्याचा तिचा प्रवास कसा आहे.
[read_also content=”ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर सापडली रहस्यमय वस्तू, चांद्रयान-३ चा संबंध असल्याचा संशय! लोकांमध्ये कुतूहल! https://www.navarashtra.com/world/mysterious-object-found-off-australian-coast-suspected-to-be-related-to-chandrayaan-3-nrpa-433151.html”]
प्रियांकाचा जन्म 18 जुलै 1982 रोजी जमशेदपूरमध्ये झाला. प्रियांकाचे वडील अशोक चोप्रा आणि आई मधु चोप्रा दोघेही सैन्यात होते. प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ तिच्यापेक्षा सात वर्षांनी लहान आहे. वयाच्या तेराव्या वर्षी प्रियांका शिक्षणासाठी अमेरिकेत गेली. तीन वर्षांनी ती भारतात परतली तेव्हा तिनं बरेलीत शिक्षण घेतलं.
वयाच्या 17 व्या वर्षी जिंकली मिस वर्ल्ड स्पर्धा
या दरम्यान, एक सौंदर्य स्पर्धा जिकंल्यानंतर तिच्या आईला तिने याच क्षेत्रात पुढे जावे असे वाटलं आणि त्यांनी प्रियांकाचे काही फोटो मिस इंडिया स्पर्धेसाठी पाठवले. 2000 साली प्रियंकानं तिच्या परिश्रम आणि टॅलेंटच्या जोरावर वयाच्या 1७ वर्षी मिस वर्ल्ड चा किताब पटकावला. यावेळी फिनालेमध्ये प्रियंका चोप्राला विचारण्यात आले की, ती कोणत्या जिवंत स्त्रीला सर्वात यशस्वी मानते. याला उत्तर देताना प्रियांकाने तीन वर्षांपूर्वी निधन झालेल्या मदर तेरेसा यांचे नाव घेतले, तर एका जिवंत महिलेबाबत प्रश्न विचारला गेला. असे असतानाही प्रियांकाला ही स्पर्धा जिंकली.
2002 मध्येफिल्मी करिअरला सुरुवात
2002 मध्ये आलेल्या ‘थमिझन’ या तमिळ चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 2004 मध्ये आलेल्या ‘ऐतजार’ चित्रपटात तिनं नकारात्मक भूमिका साकारली, ज्याचं खूप कौतुक झालं. शिवाय या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट खलनायीकेचा पुरस्कारही मिळाला. 2008 मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटाने प्रियंकानं सगळ्यांची मनं जिकंली. प्रियंकाला ‘फॅशन’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
2018 निक जोनाससोबत बांधील लग्नगाठ
प्रियंकाने 1 डिसेंबर 2018 रोजी सिंगर निक जोनाससोबत लग्न केले. जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. निक प्रियांकापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. सध्या प्रियांका आणि निक जोनस सेरोगसीद्वारे आई – वडील झाले असून त्यांनी यांच्या मुलीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनस ठेवलं आहे.