फोटो सौजन्य - Social Media
सुप्रसिद्ध गायक राहुल वैद्य सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. दरम्यान, सोशल मीडियावर त्याने नुकतीच केलेली एक पोस्ट प्रचंड चर्चेत येत आहे. त्याने पुन्हा एकदा सामाजिक मुद्दा उचलून धरला आहे. सध्या सोशल मीडियावर गणपती उत्सवाचे ट्रेंड आहे. गणरायाची आराधना करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक कलाकार मंडळी गणेश पूजा करून त्यातून कन्टेन्ट तयार करून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
या सगळ्या बाबी पाहून राहुलने या गोष्टीचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर नमूद केले आहे की,” More than 50% people will not keep Ganpati or go for darshan if Instagram wasn’t there.. #OnlyForPhoto” याचा अर्थ की,”जर इंस्टाग्राम नसता तर ५०% लोकांनी आपल्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठाच केली नसते, अगदी दर्शनालाही गेले नसते.” यापुढे त्याने “हे फक्त फोटोसाठी आहे” असे हॅशटॅग दिले आहे. पुढे त्याचे म्हणणे आहे की “At times I get confused if it’s Fashion Show or Ganpati Dashan!” याचा अर्थ की,”एकदा तर मी स्वतः गोंधळात गेलो की हा गणेश दर्शन सुरु आहे की फॅशन शो?”
सोशल मीडियावर या पोस्टची अनेक चर्चा होत आहे. अनेकांना हे विचार पटले आहेत तर अनेकांना नाही. परंतु, राहुल वैद्य पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याआधी लालबागच्या राजाच्या येथे सादरीकरण करणारा पहिला गायक म्हणून त्याला मान मिळाला होता. ‘यासाठी तो किती भाग्यवान आहे, याची ग्वाही स्वतः राहुल वैद्यने दिली होती. गायक त्याच्या मंत्र मुग्ध गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे तसेच दरम्यान तो ‘लाफ्टर शो २’ मध्ये ही दिसून आला होता.