मुंबई :आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्यापासून राखी सावंत (Rakhi Sawant) ही सतत चर्चेत आहे. अगोदर राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर गंभीर आरोप केले आणि आता जेलबाहेर आल्यापासून आदिल दुर्रानी (Adil Durrani) हा राखी सावंतवर गंभीर आरोप करताना दिसत आहे.
राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्यामधील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. राखी सावंत हिच्यावर होत असलेले आरोप पाहून अनेकांना धक्का हा बसला आहे. दुसरीकडे राखीने देखील आदिल दुर्रानी याच्यावर आरोप केले आहेत. राखीने सांगितलं की, आदिल हा माझ्यामुळे सहा महिने जेलमध्ये नव्हता. राखी सावंत हिच्या आयुष्यामध्ये हे सर्वकाही सुरू असतानाच आता तिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. राखी सावंत हिच्यासोबत नेहमीच दिसणारी तिची बेस्ट फ्रेंड राजश्री हिने आता राखी सावंतच्या विरोधात तक्रार केली आहे.
राखी सावंतच्या वाईट काळात तिच्यासोबत राजश्री ही खंबीरपणे उभी असायची. राखी सावंत हिच्याबद्दल तक्रार केल्यानंतर राजश्रीने थेट म्हटले आहे की, मी आता राखी सावंत हिच्याबद्दल मोठे खुलासे करणार आहे आणि तिचा खरा चेहरा हा जगासमोर आणणार आहे. राजश्रीचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच धक्का बसल्याचे दिसत आहे.
आता राजश्री ही राखीबद्दल नेमके काय खुलासे करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. राजश्री हिने राखी सावंत हिची तक्रार केल्यानंतर राखी सावंत हिला याबद्दल विचारण्यात आले. यावर बोलताना राखी सावंत ही म्हणाली की, माझ्या आयुष्यात नेमके काय सुरू झाले आहे हे मलाच आता कळत नाहीये. राजश्री ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. मात्र, तिने असे का केले हे मला काहीच माहिती नाहीये. ती नेहमीच माझी मैत्रीण राहणार आहे. राजश्री हिने कायमच माझ्या वाईट काळात माझी साथ दिली आहे आणि तिच्या वाईट काळात मी तिची साथ दिली आहे. मी राजश्रीबद्दल काहीच बोलू शकत नाही. राजश्री हिच्या म्हणण्यानुसार राखी सावंत हिने तिला फोन करून धमकी दिली आहे. आता राजश्री ही राखी सावंत हिच्याबद्दल काय खुलासा करते याकडे सर्वांच्या नजरा या आहेत.






