सध्या सिनेसृष्टीत लग्नाचा सिझन सुरु झाला आहे. याची सुरुवात बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक इरा (Ira Khan) च्या लग्नाने झाली आहे. इराने बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत (Nupur Shikhare) उदयपुर मध्ये लग्न केलं. आता बॉलिवूडमधील एक कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. बॉलिवूडच्या सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक असलेल्या रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी (Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding)यांच डेस्टिनेशन वेडिंग गोव्यात होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मित्रपरिवार आणि बॅालिवुड कलाकारांच्या उपस्थितीत हे कपल लग्न करणार आहे.
[read_also content=”आमिर खानची लेक इरा आज अडकणार विवाहबंधनात, नुपुर शिखरेसोबत बांधणार लग्नगाठ! https://www.navarashtra.com/movies/aamir-khan-daughter-ira-khan-nupur-shikhare-wedding-at-mumbai-tajland-hotel-nrps-494576.html”]
रकुल आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारीला गोव्यात त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. 19 आणि 20 फेब्रुवारीला या जोडप्याचे प्री-वेडिंग फंक्शन्स होणार असल्याचेही वृत्त आहे. रिपोर्टनुसार, ‘कपल लग्नाची तारीख गुप्त ठेवू इच्छित आहे. डिझायनर्सपासून फोटोग्राफरपर्यंत कोणालाही या तारखेची माहिती देण्यात आलेली नाही. लग्न गोव्यात होत असल्याने प्रत्येकाला मोठ्या प्रमाणात तारखा देण्यात आल्या आहेत.
रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांचे प्रेमप्रकरण कोणापासून लपलेले नाही. हे जोडपे 2021 पासून एकमेकांना डेट करत आहेत. काही महिन्यांपूर्वी रकुलने तिच्या बॉयफ्रेंड जॅकीच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केली होती. रकुलने लिहिले होते की, “या वाढदिवसानिमित्त माझ्या प्रेमाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रत्येक दिवशी तुला हवे ते सर्व विपुल प्रमाणात मिळावे अशी माझी इच्छा आहे. या पोस्टमुळे त्यांच प्रेमप्रकरण चांगलच चर्चेत आलं. आता दोघही त्यांच्या नात्याला नाव देण्यास तयार आहेत.