सध्या मनोरंजन सृष्टीत एकाच चित्रपटाची खूप चर्चा होत आहे तो म्हणजे रामायण . नितेश तिवारीचा रामायण ( ramayana) या काळातील सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे. अॅनिमलमधील कठोर भूमिकेत पाहिल्यानंतर प्रेक्षक आता रणबीर कपूरला रामाच्या अवतारात पाहण्यास उत्सुक आहे. सध्या कलाकारांनी चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं आहे. आता रामायणाच्या सेटवरून काही फोटो लीक झाले आहेत. ज्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी अधीक उत्सुकता वाढली आहे. रणबीर आणि पल्लवी या फोटोमध्ये फारच सुंदर दिसत आहेत.
[read_also content=”बृजभूषण शरण सिंह यांना दिल्ली न्यायालयाचा झटका, लैंगिक छळाच्या आरोपांची अधिक चौकशी करण्याची मागणी फेटाळली! https://www.navarashtra.com/india/delhi-high-court-refuse-brij-bhushan-singh-application-in-case-of-sexual-harassments-allegation-nrps-527688.html”]
मुंबईत रामायणाच्या शूटिंगसाठी भव्य सेट लावण्यात आला आहे. या सेटवरून हो फोटो लीक (Ranbir Kapoor Sai Pallavi) झाले आहेत, ज्यात साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आणि रणबीर रामच्या भूमिकेत दिसत आहे.
रामायणाच्या सेटवरून लीक झालेल्या फोटोंमध्ये रणबीर रामच्या रुपात दिसत आहे. पण यावेळी त्याने केशरी रंगाचे कपडे घातले नसून मरून आणि जांभळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. गळ्यात सोन्याचा हार व बांगडी घातली आहे. साई पल्लवीही सीतेच्या वेशात खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर साधेपणा दिसून येतो. सुरुवातीची काही छायाचित्रे पाहता हे वेळापत्रक राम-सीतेच्या लग्नानंतरचे असल्याचे दिसते. दोघेही राजा-राणीसारखे दिसत आहेत.
टीव्ही आणि चित्रपटांच्या रामायणात राम आणि सीता भगव्या रंगाच्या पोशाखात दिसतात. मात्र नितेश तिवारी यांनी आपल्या रामायणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. साधेपणा जपण्यासोबतच कलाकारांना साधे लूकही देण्यात आला आहे.
रावण आणि हनुमानाच्या शेड्यूलचे शूटिंग सुरू होणार
अलीकडे, कैकेयीच्या भूमिकेत लारा दत्ता आणि मंथरा म्हणून शीबा चड्ढा यांची काही छायाचित्रे देखील सेटवरून लीक झाली होती. मुंबईत उभारण्यात आलेल्या भव्य सेटवर राम जन्म, गुरुकुल, राम-सीता विवाह असे काही महत्त्वाचे दृश्य चित्रीत करण्यात आले आहे. रावण आणि हनुमानाच्या भूमिका साकारणारे यश आणि सनी देओल जुलैपासून त्यांच्या भागांचे शूटिंग सुरू करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रामायणचे पुढील शेड्यूल लंडनमध्ये शूट केले जाऊ शकते.






