धर्मेंद्र यांना सुरुवातीला ठाकूरची भूमिका करायची इच्छा होती. मात्र वीरूची मस्ती, विनोद आणि बसंतीसोबतची केमिस्ट्री पाहून त्यांनी पात्र बदलण्याचा निर्णय घेतला. याच बरोबर आणखी एक कारण होतं ते म्हणजे हेमा मालिनी. वीरु आणि बसंतीचा जेव्हा जेव्हा भावनिक सीन असायचा तेव्हा धर्मेंद्र युनिटमधील लोकांना पैसे देऊन रिटेक घ्यायला सांगायचे. सिनेमाच्या शुटींग दरम्यानच धर्मेंद्र यांना हेमा मालिनी यांच्या बद्दल प्रेम वाटायला लागलं होतं त्यांच्या प्रेमाची सुरुवातच या सिनेमामुळे झाली असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही. ठाकूरची व्यक्तिरेखा साकारायची मनात इच्छा असताना देखील केवळ प्रेमाखातर त्यांनी वीरुच्या व्यक्तिरेखेला मान्य केलं.
या सिमेमाच्या ऑफ कॅमेरा किस्से सांगायचे झालेच तर त्याचा वेगळा सिनेमा करावा लागेल. धर्मेंद्र यांना जसं या सिनेमामुळे प्रेम मिळालं तसंच त्यांना खऱ्या आयुष्यात जय देखील मिळाला ते म्हणजे अमिताभ बच्चन .यांच्याशी झालेली घनिष्ट मैत्री. शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्यात खूप जवळीक निर्माण झाली. दोघेही रात्री रामगडच्या लोकेशनवर एकत्र बसून चहा, गप्पा आणि स्क्रिप्ट चर्चेत वेळ घालवत असायचे. धर्मेंद्र अमिताभला म्हणायचे “तू जयच नाहीस, तू माझा छोटा भाऊ आहेस.”
या दोन्ही मातब्बर अभिनेत्यांच्या मैत्रीचे किस्से देखील तितकेच रंजक आहेत. शूटिंग ब्रेकमध्ये संपूर्ण युनिट क्रिकेट खेळायचं तेव्हा धर्मेंद्र बॅटींग करायचे. असं शुटींगच्या मधल्या वेळेत क्रिकेट खेळताना धर्मेंद्र बॅटींग करत होते आणि अभितान फिल्डींग करत होते. त्यावेळी अमिताभने कॅच सोडल्यावर धर्मेंद्र हसत म्हणाले
“जय, दोस्ती निभावतोयस का, की कॅच टाळतोयस!” त्यावेळी संपूर्ण .युनिट हसायला लागलं होतं.
या गाण्याच्या शूटमध्ये बाइकवर बॅलन्स करणं अवघड होतं. या गाण्याच्या शूटमध्ये बाइकवर बॅलन्स करणं म्हणजे तारेवरची कसरत होती. धर्मेंद्र बाइक चालवत आणि अमिताभ मागे बसले होते. हा सीन किमान 20–25 मिनिटे सलग शूट झाला आणि दोघांनीही एकदाही तक्रार केली नाही. त्यांच्या समजूतदारीवर
शेवटी सिप्पी म्हणाले “तुम्ही दोघे खऱ्या आयुष्यातही दोस्तच दिसता.शूटिंगदरम्यान ज्या दिवशी अमिताभचा पत्ता लागायचा नाही, त्या दिवशी लहान अभिषेकला धर्मेंद्र सांभाळायचे. धर्मेंद्र त्याला आपल्या खांद्यावर घेऊन फिरायचे. म्हणूनच अभिषेक आजही म्हणतो “धर्म पाजी माझे दुसरे बाबा सारखे आहेत.” असे हे शोले मधील जय वीरु फक्त सिनेमातच नाही तर खऱ्या आयुष्यात देखील जीवगल मित्र असल्याचे अनेक किस्से आहेत.
Ans: शोलेमधील जय–वीरूची जोडी खरी मैत्री कशी असावी याचं प्रतीक मानली जाते. सिनेमा प्रदर्शित होऊन कित्येक दशके झाली असली तरी त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आणि संवाद प्रेक्षकांच्या मनात आजही ताजी आहेत.
Ans: धर्मेंद्र यांना सुरुवातीला ठाकूरची भूमिका करायची होती. पण वीरूचं विनोदी आणि मस्तीखोर पात्र, तसेच बसंतीसोबतची केमिस्ट्री पाहून त्यांनी शेवटी वीरूची भूमिका स्वीकारली.
Ans: होय. शूटिंगदरम्यान त्यांना हेमा मालिनींबद्दल प्रेम निर्माण झालं होतं. बसंती आणि वीरूच्या भावनिक दृश्यांमध्ये जास्त वेळ एकत्र राहण्यासाठी ते युनिटमधील कर्मचाऱ्यांना रिटेक घ्यायला सांगत असत.






