'झिम्मा २'नंतर रिंकु राजगुरूचा नवा चित्रपट, मुहूर्त सोहळा संपन्न
अभिनेत्री रिंकु राजगुरूने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. ‘सैराट’ चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या आर्चीने पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. ‘सैराट’सह ‘कागर’, ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’ आणि ‘झिम्मा २’ सारख्या चित्रपटातून प्रसिद्ध झालेल्या रिंकूचा लवकरच आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. तिच्या नव्या चित्रपटाचे नाव ‘जिजाई’ असं असणार असून तिचा हा नवा चित्रपट झी स्टुडिओजच्या बॅनरखाली रिलीज केला जाणार आहे. आणखी एक नवा चित्रपट रिंकु झी स्टुडिओजसोबत करणार असल्यामुळे चाहत्यांना तिच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता आहे.
पक्षपातीपणाची पातळी बिग बॉसने ओलांडली! या सहा सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्तसोहळ्याने ‘जिजाई’ बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकताच ‘जिजाई’ चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित चित्रपटात ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर अपूर्वा शाळीग्राम या चित्रपटाच्या डीओपी आहेत. कपाळी चंद्रकोर लावलेली रिंकू या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे.
‘सैराट’च्या यशानंतर रिंकू राजगुरू आणि झी स्टुडिओज यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. आता या जोडीने पुन्हा एकदा ‘जिजाई’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचा निर्धार केला असून हा नवीन चित्रपट लवकरच प्रकारांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. झी स्टुडिओजचे बवेश जानवलेकर म्हणतात, “झी स्टुडिओजने नेहमीप्रमाणे नवोदितकलाकारांना आणि दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ असते. झी स्टुडिओजने प्रेक्षकांसाठी कायमच दर्जेदार आणि वेगळ्या आशयाचे चित्रपट सादर केले आहेत. ‘जिजाई’ हा त्याच परंपरेचा भाग आहे.”
ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘पुष्पा राज’चे वर्चस्व; पहिल्याच दिवशी केली लाखोंची कमाई!