शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अमृता राव (Amruta Rao) यांच्या रोमँटिक चित्रपट इश्क विश्कच्या (shq Vishk Sequel) सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. शिवाय, त्याची रिलीज डेटही समोर आली आहे. यावेळीही कथा नव्या पिढीवर असणार आहे. इश्क विश्क 2003 साली आला होता आणि आता 14 वर्षांनंतर इश्क विश्क रिबाउंड (Ishq Vishk Rebound) येणार आहे. चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट नवीन आहे. रोहित सराफसोबत (Rohir Safar) पश्मिना रोशन (Pashmina Roshan) दिसणार आहे. पश्मिना ही हृतिकची चुलत बहीण आहे. हे देखील त्याचं बॉलिवूड डेब्यू असेल. त्याच्याशिवाय अभिनेता जिब्रान खान आणि नैना गरेवा आहेत.
[read_also content=”हर्षवर्धन राणे रुपेरी पडद्यावर पुन्हा करणार धमाल, कॉलेजमध्ये एहान भट्टशी भिडणार, ‘दंगे’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज! https://www.navarashtra.com/movies/dange-trailer-released-of-harshvardhan-rane-ehan-bhatt-nikita-dutta-film-directed-by-bejoy-nambiar-507740.html”]
या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागलेली आहे. इश्क विश्क हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे ज्याच्या सिक्वेलची देखील प्रतीक्षा आहे. टीझर व्हिडिओ पाहून असे वाटते की हा चित्रपट प्रेम आणि नवीन कलाकारांसोबतच्या नातेसंबंधांवर आहे. हा चित्रपट 28 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. रोहित आणि पश्मीनाने त्यांच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत कॅप्शन लिहिले आहे, ‘#IshqVishkRebound #PyaarKaSecondRound 28 जून रोजी थिएटरमध्ये.’
शाहिद कपूर आणि अमृता राव यांनी इश्क विश्क या चित्रपटातून पदार्पण केले आणि त्यानंतर ते रातोरात तरुणांमध्ये पाप्युलर झाले होते. त्यांच्या गोंडस प्रेमकथेने लाखो मनं जिंकली होती. आता त्याचा सीक्वल इश्क विश्क रिबाउंडचा जनरेशन Z वर असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अविनाश धर्माधिकारी करत असून त्याचे निर्माते रमेश तौरानी आहेत. रमेश तौरानी यांनी इश्क विश्कची निर्मितीही केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन केन घोष यांनी केले होते.
रोहित शराफ अलीकडेच हृतिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर विक्रम वेधा या चित्रपटात दिसला होता. नेटफ्लिक्सच्या मिसमॅच्ड या वेब सिरीजमधून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याशिवाय त्याने प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांच्या ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटातही काम केले आहे.