फोटो सौजन्य - Social Media
४ डिसेंबर रोजी अभिनेता नागा चैतन्य याचा विवाह अभिनेत्री सोभिता धुलिपालासोबत योजिले होते. दरम्यान, हैद्राबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओजमध्ये हा विवाह कार्यक्रम सुरु आहे. मोठ्या जोरशोरात हा लग्नउत्सव पार पडत आहे. अनेक दिवसांपासून या विवाहाची सावत्र भारतभरात चर्चा सुरु आहे. अभिनेता नागा चैतन्य याचा हा दुसरा विवाह आहे. तसेच अभिनेत्री सामंथा त्याची पूर्व पत्नी असून या दोघांमुळेच या लग्नाच्या चर्चेला विशेष रूप आले आहे. लग्नसराईची तयारी सुरु असताना नागा चैतन्याची पूर्व पत्नी सामंथाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर असे काही शेअर केले आहे, ज्याने सर्वत्र चर्चेचे वातावरण तयार झाले आहे. या चर्चेला विशेष रूप असल्याचे कारण लग्नाच्या अवघ्या काही अवधी आधी सामंथाने तिच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर स्टोरी पोस्ट केली आहे.
सामंथाने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक कुस्तीचा व्हिडीओ आहे. या व्हिडिओमध्ये लहान मुलांमध्ये कुस्तीची स्पर्धा सुरु आहे. त्यातील मुलगी त्या मुलाला अगदी सहजरित्या जमिनीवर लोळवते. एकंदरीत, ‘मुलीही कोणापेक्षा कमी नाहीत’ असा काही संदेश देण्याचा प्रयत्न सामंथाकडून करण्यात आला आहे. तिच्या या कृतीमुळे नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाच्या विवाहाच्या चर्चेला एक नवीन शाखा फुटली आहे. १९७६ मध्ये नागा चैतन्य याचे आजोबा तसेच अभिनेता नागार्जुनचे वडील यांनी हैद्राबादमध्ये अन्नपूर्णा स्टुडिओची निर्मिती केली होती. या स्टुडिओमध्येच दोघांचे विवाह मोठ्या धूम धडाक्यात सुरु आहे.
अशा प्रकारे झाली नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाची भेट
नागा चैतन्य याचे वडील आणि सुप्रसिद्ध अभिनेता नागार्जुन यांना सोभिता धुलिपालाचे अभिनय फार आवडत होते. ते तिचे फार मोठे चाहते होते. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा गुडचारीमध्ये सोभिता धुलिपालाने साकारलेल्या अभिनयावर अभिनेता नागार्जुन मोहित झाले होते. तेव्हा नागार्जुन यांनी सोभिता धुलिपालाला त्यांच्या घरी एक भेट देण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी सोभिता धुलिपाला हिची नागा चैतन्याशी पहिली भेट झाली.
नवरा नवरीचा आकर्षक आऊटफिट पाहून नेटकर्त्यांनी केले कौतुक
अभिनेता नागा चैतन्यने लग्नासाठी पंचा परिधान केला आहे. नागा चैतन्यचा हा पोशाख त्याच्या आजोबांशी प्रेरित आहे. त्याचे आजोबा यांच्या शैलीला अनुसरून त्याने हा पोशाख परिधान करण्याचे योजिले होते. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी नागा चैतन्याच्या साधेपणाचा कौतुक केला आहे. तसेच सोभिता धुलिपालाने कांजीवरम साडी परिधान केली आहे. या साडीची विशेष गोष्ट म्हणजे यावर सोन्याची परत आहे.