"प्रियंकापेक्षा चांगली भूमिका मी...", ईशा कोप्पिकर स्पष्टच बोलली
बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पिकर (Isha Koppikar) गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. २००० नंतर तिने काही काळ अनेक सुपर डुपर हिट चित्रपट दिले आहेत. गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दुर राहिलेली ईशा कोप्पिकर सध्या ‘अयलान’ चित्रपटामुळे चर्चेत होती. दरम्यान अभिनेत्रीने ‘गलाटा इंडिया’ला मुलाखत दिली. मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरने २००६ मध्ये शाहरुख खानच्या ‘डॉन’ या चित्रपटात काम केले होते. मात्र, तिला ‘डॉन’च्या सिक्वलमध्ये काम मिळाले नाही. या मुलाखतीत तिने याबद्दल आपले मत व्यक्त केले.
ईशा गुप्ताच्या सौंदर्याची मोहिनी नेटकऱ्यांवर भाळली…
‘गलटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ईशा कोप्पीकरने ‘डॉन’चित्रपटात काम करण्याचा अनुभव शेअर करताना सांगितले की, “जेव्हा मला ‘डॉन’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा मला खूप आनंद झाला होता. प्रियांकाच्या तुलनेत माझी भूमिका खूपच लहान आणि विकसित केलेली नव्हती. प्रियांका चोप्राची भूमिका माझ्या भूमिकेपेक्षा अधिक प्रभावशाली होती. तिची भूमिका अधिक सशक्त होती आणि ती खूप चांगल्या प्रकारे विकसित करण्यात आली होती. त्या भूमिकेसाठी मी काहीही करू शकले असते. मी तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट जिंकलेय. मी गेल्या २५ वर्षांपासून तायक्वांदो शिकत आहे. मी खूप चांगल्या पद्धतीने ॲक्शन करू शकते. ॲक्शन सीन्सच्या बाबतीत मी आजही कोणत्याही अभिनेत्रीला टक्कर देऊ शकते.”
२५ वर्षानंतर मायदेशी परतली ममता कुलकर्णी! मुंबई एअरपोर्टवर येताच झाली भावुक; व्हिडीओ व्हायरल
२०११ साली रिलीज झालेल्या ‘डॉन २’मध्ये ईशाला भूमिका मिळाली नव्हती, याचा तिला खूप राग आला होता. त्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, “मला ‘डॉन २’ चित्रपटात भूमिका मिळावी यासाठी मी निर्मात्यांसोबत स्वतःहून संपर्क साधला होता, पण मी संपर्क साधण्याआधीच त्या भूमिकेचे कास्टिंग झाल्याची मला माहिती मिळाली. हे ऐकून सुरुवातीला मला खूप वाईट वाटले. ठिके काही हरकत नाही, कधी तुम्ही जिंकता तर कधी हरता, असं म्हणत मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं.” ईशा कोप्पिकरने ‘कृष्णा कॉटेज’, ‘एक विवाह ऐसा भी’, ‘क्या कूल है हम’ सारख्या काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वीच ईशाचा पती टिम्मी नारंगसोबत घटस्फोट झाला. तेव्हापासून ती आणि तिची सात वर्षीय लेक वेगळे राहत आहेत.