अभिनेता शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ चित्रपटाला चांगल यश मिळालं. प्रेक्षकांनी या चित्रपटाला पंसती दर्शवली. आता नुकतचं शाहिदला त्याच्या लेडी लव्हसोबत मुंबईतील एका रेस्टारंटबाहेर स्पॅाट करण्यात आलं. मात्र, तिथं असं काही घडलं की शाहिदचा नाराज झाला. त्याने पापाराझींना फटकारलं आणि त्यांना योग्य वागण्यास सांगितलं. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेमकं काय केलं शाहिदने बघा.
[read_also content=”’12वी फेल’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, टूलूस चित्रपट महोत्सवात जिंकला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार! https://www.navarashtra.com/movies/12th-fail-wins-best-film-award-in-toulouse-film-festival-2024-vidhu-vinod-chopra-film-starring-vikrant-massey-nrps-526411.html”]
सोमवारी संध्याकाळी शाहिद कपूर पत्नी मिरा राजपूतसोबत रोमँटिक डिनर डेटवर गेला होता. जेवण करून दोघेही रेस्टॉरंटमधून बाहेर आले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींना पाहून शाहिद फारसा आनंदी दिसला नाही, उलट तो त्यांच्यावर रागावू लागला. रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना शाहिद पत्नी मीरा राजपूतचा हात धरून बाहेर पडत होता. पण रेस्टॉरंटमधून बाहेर येताच पापाराझींनी त्याचे फोटो क्लिक करायला सुरुवात केली. पण शाहीदला हे सहन झाले नाही आणि अचानक त्याने पापाराझींना फटकारायला सुरुवात केली. शाहिदचा मूड खूपच अस्वस्थ दिसत होता, त्याने पापाराझींना फटकारले आणि फोटो काढण्यासही नकार दिला.
या व्हिडिओमध्ये शाहिदची नाराजी स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडिओवर लोकांकडून अनेक कमेंट येत आहेत. काही लोक शाहिदचे समर्थन करत आहेत, तर काहीजण त्याच्या वागण्याबद्दल त्याला सल्ला देत आहेत. या व्हिडिओमध्ये शाहिद खूप रागावलेला दिसत असून पापाराझींना वारंवार थांबण्याचे संकेत देताना दिसत आहे. शाहिद म्हणाला, “यार, तुम्ही थांबाल का, लोकं नीट वागशील का?”
एका युजरने म्हटले की, “शाहिदने मीराचा हात जबरदस्तीने पकडला आहे.” दुसऱ्या यूजरने लिहिले की, “(शाहिद-मीरा) दोघांची वृत्ती आहे.” पापाराझी वर नाराजी. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शाहिद कपूर दिग्दर्शक सचिन बी रवी यांच्या ‘द इमॉर्टल अश्वत्थामा’ आणि आदित्य निंबाळकर दिग्दर्शित ‘बुल’ या चित्रपटात दिसणार आहे.