मुंबई : आज मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान (loksabha election) पार पडत आहे. सकाळपासून नागरिक मतदान करताना दिसत आहेत. यामध्ये बॅालिवूड सेलेब्रिटी मागे नाही. अभिनेत्री जान्हवी कपूर, राजकुमार राव, फरहान अख्तर, झोया अख्तर, परेश रावल, तब्बू आणि अक्षय कुमारसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मुंबईत मतदान केलं.
[read_also content=”भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने केलं पहिलं मतदान, चाहत्यांना केलं आवाहन! https://www.navarashtra.com/latest-news/akshay-kumar-casts-first-vote-for-lok-sabha-2024-elections-after-getting-indian-citizenship-nrps-535456.html”]
गेले काही दिवस अनेक सेलेब्रिटी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आज मतदानाचा दिवस असून कलाकारही उत्साहात मतदान करताना दिसत आहेत.
पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, अभिनेत्री जान्हवी कपूर सकाळीच मतदान मतदानासाठी तिच्या घराबाहेर पडली. हातात मतदार कार्ड घेऊन गुलाबी अनारकली सूटमध्ये जान्हवी फारच सुंदर दिसत होती. मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी आणि बाहेर पडल्यानंतर तिने चमकदार स्मितहास्य देखील केलं आणि पापाराझींसाठी पोझ दिली.
या व्यतिरिक्त भिनेता राजकुमार राव देखील मतदान करण्यासाठी आला. मरून प्रिंटेड टी-शर्ट घालून आला होता. मतदान केल्यानंतर त्याने शाई लावलेलं बोट दाखवत फोटोही काढला.
यासोबतच अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची बहीण झोया अख्तर देखील मतदानासाठी पोहोचलेल्या इतर सेलिब्रिटींमध्ये दिसले. एका व्हिडिओमध्ये, मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर भाऊ-बहीण जोडीने पापारांझींना पोझही दिली.
उल्लेखनीय म्हणजे, अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, अर्जुन कपूर आणि इतरांसह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी आपापल्या सोशल मीडिया हँडलवर लोकांना मतदान करण्याचे आवाहन केलं होतं.