Sharad Talwalkar Grandson
‘असला नवरा नको गं बाई’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘सुधरलेल्या बायका’, ‘मुंबईचा जावई’, ‘अवघाची संसार’ आणि अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये स्वर्गीय मराठमोळे अभिनेते शरद तळवलकर यांनी काम केले आहे. १९५० ते १९९० च्या काळामध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर शरद तळवलकर यांनी अधिराज्य गाजवले आहे. २००१ मध्ये वयाच्या ८२ व्या वर्षी शरद तळवलकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची दोन्हीही मुलं परदेशामध्ये राहतात. त्यांचा एक नातू कपिल तळवलकर (Kapil Talwalkar) सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे.
शरद तळवलकर यांना उमेश आणि हेमंत अशी दोन मुलं आहेत. हेमंत यांचा हॉलिवूड अभिनेता कपिल तळवलकर हा मुलगा आहे. हेमंत हे भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूंपैकी एक होते. १९७७- ८० च्या काळात हेमंत यांनी रणजी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर ते सुद्धा परदेशामध्ये गेले. तिथेच हेमंत यांचा मुलगा कपिल तळवलकरचा जन्म झाला. कपिलचं आजोबांसोबत चांगलं बॉंडिग होतं. त्याचं तेव्हाच ठरलं होतं की मोठं झाल्यानंतर आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात जायचं. पण आजोबांच्या निधनानंतर त्याला त्यांच्याकडून पुरेसं मार्गदर्शन मिळालं नाही.
परदेशात देशी लूकमध्ये चमकला परिणीती चोप्राचा पती, कपलच्या क्युट फोटोने वेधले लक्ष
कपिलने शाळा, कॉलेजमध्ये शिकत असताना अमेरिकेत राहून नाटकातून काम करण्यास सुरुवात केली. पुढे युनिव्हर्सिटीमधून त्याने अभिनय आणि संगीताचे शिक्षण घेतले. संगीतकार, अभिनेता, पटकथाकार, लेखक अशी कपिलनं हॉलिवूडमध्ये ओळख बनवली आहे. ‘अमेरिकन प्रिन्सेस’ या चित्रपटातून तो हॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाला आहे. ‘झोयास एक्स्ट्रा ओर्डीनरी’, ‘ख्रिसमस चार्म सिरीजच्या ४’ सीझनमध्ये तो झळकला आहे. पुढे ‘सेशन 19’ या सीरीजमध्ये तो मुख्य भूमिकेत दिसला. कपिलने अभिनेता म्हणून तर ओळख बनवलीच पण काही चित्रपटासाठी त्याने डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम केले.
Masaba Gupta पुन्हा एकदा देणार ‘गुडन्यूज’? व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी बुचकळ्यात
कपिल त्याच्या आजोबांसोबतचे फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या खोलीतही आजोबा शरद तळवळकर यांच्या चित्रपटाचा एक फोटो आहे, तर दुसऱ्या बाजूला आजी उषा वाटवे यांचा फोटो त्याने लावला आहे. ‘हे दोन्ही फोटो माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत’ असे तो हे फोटो शेअर करताना म्हणाला. एक संगीतकार, अभिनेता, लेखक, पटकथाकार अशी कपिलने हॉलिवूडसृष्टीत ओळख बनवली आहे. हॉलिवूड चित्रपटाचा मुख्य नायक म्हणून त्याच्याकडे आणखी काही नवीन प्रोजेक्ट आहेत. त्यामुळे निश्चितच तळवळकर यांचा नातू म्हणून मराठी प्रेक्षकांना त्याचा अभिमान आहे.