मुंबई : सोशल मीडिया स्टार आणि अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी आणि बोल्ड लूकमुळे नेहमी चर्चेत असते. तिचा अतरंगी अवतार नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. अनेकदा यामुळे तिच्यावर टीका होऊन तिला ट्रोल देखील केलं जातं, पण उर्फी मात्र कोणाचं ऐकायचं नाव घेत नाही. ती अनेकदा अशाच बोल्ड कपड्यांमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसते. आता नुकतेच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक ट्वीट शेअर करुन उर्फी जावेदवर निशाणा साधला आहे. उर्फीला बेड्या ठोका, अशी मागणी या ट्वीटच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.
चित्र वाघ यांचे ट्विट :
शी…ऽऽऽऽ
अरे..हे काय चाललयं मुंबईत
रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला @MumbaiPolice कडे
IPC/CRPC आहेत की नाहीतात्काळ बेड्या ठोका हीला
एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये @CPMumbaiPolice pic.twitter.com/M1loh1Mhge— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 30, 2022
नेटकऱ्यांच्या कमेंट्स :
चित्रा वाघ यांच्या या ट्वीटला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘बरोबर ताई अशा मुलींना काही वाटता की, नाही आम्हाला बघायला पण लाज वाटत आहे. ही रस्त्यावर उभी आहे.’ तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, ‘या बाईला रोखायला हव पण त्याचा पेक्षा फॅशन डिझायनर वर कठोर कारवाई करायची गरज आहे.’ उर्फी जावेद ही एक अभिनेत्री असून तिने यापूर्वी दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिचे वेगवेगळे लूक हे चर्चेत असतात.