फोटो सौजन्य – Youtube (Bhajan Marg)
बॉलीवूडचे एक्ट्रेस शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि तिचा पती राज कुंद्रा हे सातत्याने चर्चेत राहिले आहेत. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा बऱ्याचदा अनेक आरोपांनी वेढलेला पाहायला मिळाला आहे. शिल्पा शेट्टी आणि राजपुत्र यांच्या संदर्भात आता नवा घोटाळा समोर आला आहे. शिल्पा राज आणि एक अज्ञात व्यक्ती विरुद्ध फसवंतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईमधील एका व्यावसायिकाची आर्थिक गुन्हे शाखेने 60.4 कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि एक अज्ञात व्यक्ती या तिघां विरोधात बंद पडलेल्या कंपनी बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर मोठे मोठे आरोप लागत असताना दुसरीकडे आता ते दोघेही प्रेमानंद महाराज यांच्या भेटीला गेले होते. सध्या या दोघांचा व्हिडिओ प्रेमानंद महाराज यांच्या यूट्यूब चॅनेलवर त्याचबरोबर सोशल मीडिया चॅनलवर देखील शेअर करण्यात आला आहे. प्रत्येकजण प्रेमानंद महाराजांसोबत त्यांच्या मनातील भावना शेअर करत राहतो.
अनेक सेलिब्रिटी त्यांना भेटायलाही गेले आहेत आणि आता अलिकडेच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा त्यांना भेटायला गेले होते आणि याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. दरम्यान, वृत्तानुसार, राज कुंद्राने प्रेमानंद महाराजांना त्यांची एक किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिल्पाने महाराजांना राधाचे नाव कसे जपायचे हे विचारले. त्यावर त्यांनी तिला सांगितले की हा मंत्र तिला सर्व त्रासांपासून कसे मुक्त करू शकतो आणि संतांच्या मार्गदर्शनाचे पालन करून ती पूर्ण आयुष्य जगू शकते.
त्याच संभाषणादरम्यान प्रेमानंद महाराजांनी सांगितले की त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत आणि गेल्या १० वर्षांपासून ते याच अवस्थेत जगत आहेत. ते म्हणाले की त्यांना भीती वाटत नाही कारण देवाचा आवाज कोणत्याही क्षणी येऊ शकतो. हे ऐकून राज भावनिक होतो आणि म्हणतो की मी गेल्या २ वर्षांपासून तुम्हाला फॉलो करत आहे. माझे कोणतेही प्रश्न नाहीत कारण तुमचे व्हिडिओ नेहमीच माझ्या प्रश्नांची आणि भीतींची उत्तरे देतात. तुम्ही सर्वांसाठी प्रेरणा आहात.
Shilpa Shetty और Raj Kundra से महाराज जी की क्या वार्ता हुई ? Bhajan Marg pic.twitter.com/33PyAQAMpk
— Bhajan Marg (@RadhaKeliKunj) August 14, 2025
मला तुमच्या आरोग्याची स्थिती माहिती आहे आणि जर मी तुम्हाला किडनी दान करून मदत करू शकलो तर ते माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट असेल. यावर प्रेमानंद महाराज म्हणतात, ‘तुम्ही आनंदी राहा एवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे. जोपर्यंत हाक येत नाही तोपर्यंत आपण हे जग सोडून जाणार नाही. पण मी तुमच्या सदिच्छा मनापासून स्वीकारतो.’