Dipika Kakar Surgery Lasted For 14 Hours Shoaib Ibrahim Gave Health Update To Fans
‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सध्या अभिनेत्री लिव्हर कॅन्सरचा सामना करत असल्यामुळे ती रुग्णालयात उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीला लिव्हर ट्युमरचे निदान झाले होते. तिला या आजाराचे निदान झाल्यानंतर तिच्या पतीसह संपूर्ण कुटुंबाना मोठा धक्का बसला आहे. दीपिकासोबत तिचा पती शोएब कायमच या कठीण काळात उभा राहिलेला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शोएब सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दीपिकाच्या हेल्थबद्दल अपडेट देताना दिसत आहे.
नुकतीच दीपिकावर लिव्हर ट्युमरबाबतीत सर्जरी करण्यात आली. शोएबने दीपिकाच्या फॅन्सला तिची हेल्थ अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. शोएबने एक ब्लॉग शेअर करत चाहत्यांना तिच्यावर शस्त्रक्रिया कशी करण्यात आली ? याबद्दलची माहिती दिली आहे. शेअर केलेल्या ब्लॉगमध्ये शोएब म्हणतो, “दीपिकाचा ट्युमर काढून टाकण्यात आला असून तिला आयसीयूमधून तिला नॉर्मल रुममध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. दीपिकाच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. दीपिकावर जवळपास १४ तास शस्त्रक्रिया चालली. त्या काळात घरातले सर्वच लोकं फार चिंतेत होते. दीपिकाला सकाळी ८:३० वाजता शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन रुममध्ये शिफ्ट करण्यात आले होते. तिच्यावर शस्त्रक्रिया रात्री ११:३० वाजेपर्यंत चालली.”
प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाने ड्रायव्हरला चाकूने भोसकलं, नेमकं कारण काय ?
ब्लॉगमध्ये पुढे शोएबने सांगितलं की, “दीपिकाची सर्जरीनंतर तब्येतीत सुधारणा होत असून आम्ही डॉक्टरांचे आभार मानतो. ज्या दिवशी शस्त्रक्रिया झाली त्यादिवशी सायंकाळी ६-७वाजल्यानंतर मी आणि आमच्या घरातले घाबरू लागलो होतो. आतून कोणतीही बातमी येत नव्हती, घरी कोणीही इतकी लांब शस्त्रक्रिया कधीच पाहिली नव्हती. पण, डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की जर ते अपडेट देण्यासाठी बाहेर आले नाहीत तर सर्जरी व्यवस्थित चालू आहे आणि ती पूर्णपणे ठीक होईल”
“दीपिकाच्या पित्ताशयमध्ये एक खडा होता. सर्जरी करताना तोदेखील काढण्यात आला आहे. दीपिकाच्या लिव्हरचा छोटा भाग कापून टाकावा लागला कारण ट्यूमर कॅन्सरयुक्त होता. लिव्हर स्वत:च स्वत:ची रिकव्हरी करत असतं. त्यामुळे आम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. पण, आम्हाला सतर्क राहून तिची काळजी घ्यावी लागणार आहे”, असंही शोएबने सांगितलं.