आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र, नुकतचं आता ती जीवंत असल्याची बातमी समोर आली आहे. तिनं स्वत: इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत ती जीवंत (Poonam Panday Alive) असल्याचं सांगितलं आहे.
[read_also content=”अखेर 24 तासाच्या ड्रामाचा पर्दाफाश, स्वता:च्या मृत्यूच्या बनाव रचणारी पूनम पांडे आहे जिवंत! https://www.navarashtra.com/movies/poonam-pandey-alive-she-shared-a-video-on-instagram-about-fake-death-news-nrps-504179.html”]
पूनमच्या मृत्यूच्या बातमीनंतर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. लोक म्हणू लागले होते की हा नक्कीच पब्लिसिटी स्टंट आहे. लोक विचारत होते की तिचा मृत्यू कसा आणि कधी झाला. तिचा मृतदेह कुठे आहे? तिला कॅन्सर झाला तर कोणालाच का कळले नाही? तिच्या मृत्यूची बातमीवर नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आणि आता लोकांचा संशयही खरा ठरला आहे. पूनम जीवंत असून तिने स्वत व्हिडिओ पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.
एका यूजरने लिहिले की, हा एक वाईट विनोद आहे, असं पब्लिसिटी स्टंट कोण करतो?
एका यूजरने लिहिले- लोक म्हणत आहेत पूनम पांडे जिवंत आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने इतक्या लवकर कोणीही मरत नाही. दुसरं म्हणजे ती कानपूरमध्ये नव्हती. जर तो स्टंट असेल तर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील.
आणखी एका यूजरने लिहिले- पूनम पांडेंचा मृत्यू झाला आहे का? ती जिवंत आहे का? सोशल मीडियावर फिरणारा हा पब्लिसिटी स्टंट होता का? कोणी सत्य सांगेल का? मी प्रार्थना करतो की तो अजूनही जिवंत आहे.
एका यूजरने लिहिले- आम्हाला विश्वास आहे की पूनम पांडे जिवंत आहे. तिच्या मृत्यूच्या बातमीद्वारे ती पब्लिसिटी स्टंट करत आहे.
शुक्रवारी पूनम पांडेच्या टीमने सोशल मीडियावर त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून अधिकृत निवेदन जारी केले होते. त्यात लिहिले होते, ‘आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी खूप कठीण आहे. आम्ही आमच्या लाडक्या पूनमला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने गमावल्याचे जाहीर करताना दुःख होत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक सजीवाला त्यांनी पूर्ण प्रेम आणि दयाळूपणा दिला. या दुःखाच्या काळात, आम्ही चाहत्यांकडून गोपनीयतेची विनंती करतो जेणेकरून आम्ही त्यांना प्रेमाने लक्षात ठेवू शकू.