कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना राजू श्रीवास्तव यांचे भाऊ दीपू श्रीवास्तव म्हणाले की, त्यांचा एमआरआय रिपोर्ट आला आहे. त्यांच्या मेंदूच्या नसा दाबल्या गेल्या आहे. त्यामुळे कॉमेडियनला सावरायला काही दिवस लागू शकतात. 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये वर्कआउट करत असताना अचानक छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे ते खाली पडले होते.
त्यानंतर त्यांच्या टीमने त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले. जिथे त्यांच्यावर एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी ऐकून त्यांचे चाहते खूप दु:खी झाले आहेत आणि ते त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी सतत शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, ताज्या वृत्तानुसार, राजू श्रीवास्तव यांच्या भावाने त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितले की, कॉमेडियनच्या डॉक्टरांनी काल रात्री एमआरआय केला होता. ज्याचा अहवाल आता आला आहे.
रिपोर्टमध्ये राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूच्या नसा दबल्या गेल्याचं समोर आलं आहे, रिपोर्ट्स पाहता राजू श्रीवास्तव यांची प्रकृती बरी होण्यासाठी 10 दिवस लागू शकतात असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे राजू श्रीवास्तव यांच्याबाबत सोशल मीडियावरही अनेक अफवा पसरल्या आहेत. त्यासंदर्भात त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या व्यवस्थापकाचे वक्तव्यही समोर आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटुंबातील सदस्य आणि व्यवस्थापकाने खोट्या अफवा पसरवू नका आणि त्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. आता राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.