फोटो सौजन्य: Social Media
स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी हे दोघेही मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम कलाकार आहेत. दोघांनी अनेक चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता हे दोन्ही कलाकार एकाच चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. ‘सुशीला-सुजीत’ असे या चित्रपटाचे नाव आहे. सध्या दोन्ही कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनच्या कामात गुंतले आहे. अशातच स्वप्नील जोशीने आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्वप्नील सोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील आहे. यावेळी दोघे कलाकार मोठमोठ्याने मदत मागत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
असं काय बरं घडल असेल की मराठी चित्रपटसृष्टीतील दोन कलाकारांना ओरडून प्रेक्षकांची मदत घ्यावी लागली असले ? सध्या सोशल मीडियावर अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या दोघांचा एक व्हिडिओ चर्चेत आहे आणि त्याला कारण देखील तेवढच खास आहे. व्हिडिओमध्ये दोघे ओरडून हेल्प असं सांगतात ! हे प्रकरण नक्की काय हे बघायला त्यांनी प्रेक्षकांना चक्क सिनेमा गृहात बघायला बोलवलं आहे.
आता मदत मागता मागता या दोन कलाकारांनी प्रेक्षकांना हाकेचा आवाज तर दिला आहे पण हे प्रकरण काय नक्की घडतंय काय हे बघायला प्रेक्षकांना 18 एप्रिल ची वाट बघावी लागणार आहे. कारण निर्माता अभिनेता स्वप्नील जोशी चा नवा कोरा चित्रपट ” सुशीला – सुजीत ” प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यांनी प्रेक्षकांना या व्हिडिओ मधून त्यांनी चित्रपटाची एक खास झलक त्यांनी या निमित्ताने शेअर केली आहे. हा चित्रपट नक्कीच चित्रपट गृहात काहीतरी गोंधळ घालणार आहे असं दिसतंय.
चित्रपटात सुजीतची भूमिका स्वप्नील साकारत असून फक्त अभिनय न करता निर्मात्याच्या खुर्चीत देखील स्वप्नील दिसणार आहे आणि म्हणून हा चित्रपट स्वप्नील साठी खास आहे. सुशीला – सुजीत मध्ये स्वप्नील दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी वेगळं बघायला मिळाव आणि त्यांचं निखळ मनोरंजन करावं या साठी स्वप्नील वैविध्यपूर्ण भूमिका साकारतो आणि या चित्रपटात देखील त्याची वेगळी आणि लक्षवेधी भूमिका असल्याचं कळतंय.
‘सुशीला सुजीत’ च्या सोबतीने स्वप्नील येणाऱ्या काळात अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मध्ये तर दिसणार आहे पण तो त्याचा पहिल्या वहिल्या गुजराती चित्रपटात देखील मुख्य भूमिका साकारणार आहे.