Untavarche Shahane Marathi Movie Shooting Muhurta
मराठीत अनेक अर्थपूर्ण म्हणी आहेत, पण ‘उंटावरचा शहाणा’ म्हणीला एका वेगळ्या ढंगात विनोदी स्वरूप देणारा ‘उंटावरचे शहाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सौम्या प्रोडक्शनच्या निर्मितीखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ ६ मार्च २०२५ रोजी दिमाखदार सोहळ्यात पार पडला.
चित्रपटाचे निर्माते प्रशांत अनिल गवळी, दिग्दर्शक शुभम सुनील दळवी, छायाचित्रकार के. विजय, कार्यकारी निर्माता विष्णु घोरपडे, आणि लाइन प्रोड्यूसर बजरंग मासाळ यांच्या उपस्थितीत मुहूर्ताचा सोहळा संपन्न झाला. चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणेच हा एक हलकाफुलका, विनोदी आणि मनोरंजनाने भरलेला प्रवास असणार आहे.
सायबर सेलनंतर आता रणवीर- अपूर्वा महिला आयोगासमोर हजर, सुनावणीमध्ये आयोग काय म्हणाले ?
‘उंटावरचा शहाणा’ ही मराठी म्हण आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या विसंगत आणि गंमतीशीर प्रसंगांवर मार्मिक भाष्य करणारी आहे. आणि हाच पैलू या चित्रपटात मनोरंजक पद्धतीने दाखवला जाणार आहे. समाजातील गमतीशीर आणि विसंगत गोष्टींवर हास्याचा चपखल तडका देत हा सिनेमा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणार आहे.
“‘उंटावरचे शहाणे’ हा केवळ विनोदी चित्रपट नसून, तो आपल्या भोवतालच्या जगाकडे मिश्किल नजरेने पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देईल. प्रेक्षकांना हलकं-फुलकं आणि ताजेतवाने करणारे मनोरंजन देण्याचा आमचा प्रयत्न असेल. या सिनेमाच्या माध्यमातून समाजातील काही विसंगतींवर हसत-हसत भाष्य करताना, त्यातून एक महत्त्वाचा संदेशही देण्याचा आमचा मानस आहे.” असे दिग्दर्शक शुभम सुनील दळवी म्हणाले.
आलिया भट्ट करतेय दुर्धर आजाराशी सामना; खुलासा करत म्हणाली, ‘स्ट्रगल करावा लागतोय…’
चित्रपटाच्या टीमकडून लवकरच कलाकारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे. या अनोख्या संकल्पनेवर आधारित चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.