काय नेमकं प्रकरण?
आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे नाव आकांक्षा गायकवाड (२५ वर्षीय) असे आहे. आकांशा नांदेडमध्ये होमिओपॅथीचे शिक्षण घेत होती. गेल्या ८ ते १० महिन्यांपासून त्यांना फीस भरा म्हणून जीवन घोगरे त्रास देत होते. याच त्रासाला कंटाळून आकांशाने वसतीग्रुहात गळफास घेतल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. आकांक्षाचे वडील मुंजाजी गायकवाड यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी उचलला टोकाचा पाऊल
पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच अजित पवार पक्षाचे नेते तथा महापालिका माजी विरोधी पक्ष नेता जीवन घोगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी ग्रामीण पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नांदेडमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयातून तरुणाची अमानुष मारहाण; जागीच मृत्यू
नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नातलगातील विवाहित महिलेसोबत संबंध ठेवल्याचा रागातून २२ वर्षीय तरुणाला अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ३ मार्च रोजी पहाटे मौजे थडीसावळी येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
सात जणांना अटक
पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून महिलेचा पती पद्मसिंह गंगासिंह ठाकूर याच्यासह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे नाव राजूसिंह गंगासिंह ठाकूर, गंगासिंह हनुमानसिंह ठाकूर (रा. थडीसावळी), तसेच दिलीपसिंह ठाकूर, विजयसिंह ठाकूर, विशालसिंह ठाकूर आणि प्रतापसिंह ठाकूर (रा. निर्मल, तेलंगणा) यांचा समावेश आहे.पोलिसांनी सर्व आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Ans: नांदेडशहरातील वसतिगृहात ही घटना घडली.
Ans: आकांक्षा मुंजाजी गायकवाड (वय 25) ही होमिओपॅथी शिक्षण घेणारी विद्यार्थिनी होती.
Ans: वसतिगृहचालक व राष्ट्रवादी काँग्रीस नेते जीवन घोगरे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा व अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






