‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) गेली अनेक वर्ष हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र प्रेक्षकांचा हा लाडका शो लवकरच निरोप (The Kapil Sharma Show Last Episode) घेणार आहे. या शोचा होस्ट कपिल शर्मा आणि मार्गदर्शक अर्चना पुरण सिंग (Archana Puran Singh) यांनी याविषयी घोषणा केली आहे. या दोघांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत शो बंद होत असल्याचं सांगितलंय.
कपिल शर्मा आणि अर्चना पुरण सिंग या दोघांनी एकत्र फोटोशूट केलं आहे. हे फोटो शेअर करत या दोघांनी शो बंद होणार असल्याचं जाहीर केलंय.
या फोटोत कपिलने पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट घातला असून त्यावर नारंगी रंगाचे फ्लोरल जॅकेट आणि निळ्या रंगाची जीन्स असा लूक केला आहे. अर्चना पुरण सिंगने तपकीरी आणि हिरव्या रंगाचा सुट घातला आहे. दोया फोटोंना कॅप्शन देत कपिल शर्माने लिहिले आहे, “अर्चना मॅमसोबत या सीझनचं शेवटचं फोटोशूट. आम्ही तुम्हाला युएसएमध्ये खूप मिस करु. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे.” अशी पोस्ट करत या सीझनच शेवटचं शूट करत असल्याची माहिती कपिलने दिली आहे.
कपिल शर्माने आपल्या प्रेक्षकांना शोचा सीझन संपणार असल्याचं कळवलंय. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिल शर्मा आणि अर्चना पुरण सिंग हे दोघेही एकमेकांवर नेहमीच जोक्स करत असतात. शो संपतोय हेदेखील त्यांनी विनोदी अंदाजात सांगितलंय.
शेवटचा एपिसोड ‘गदर-2’ च्या टीमसोबत शूट
‘द कपिल शर्मा शो’चा शेवटचा एपिसोड ‘गदर-2’ च्या टीमसोबत शूट होणार आहे. या एपिसोडमध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल हजेरी लावणार आहेत. या भागाचं प्रक्षेपण 2 जुलै किंवा 9 जुलैला होणार आहे.
नवा शो
कपिल शर्माच्या शोच्या जागी कोणता शो येणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ‘इंडियास् गॉट टॅलेंट’ हा कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ च्या वेळेत दाखवला जाणार आहे. या शोमध्ये शिल्पा शेट्टी, किरण खेर, बादशाह प्रशिक्षक आहेत.
कपिल पुढे करणार काय?
‘द कपिल शर्मा शो’ची संपूर्ण टीम एका महिन्यासाठी युएसएला जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी स्वतः कपिलने सोशल मीडियावरून दिली होती. कपिल शर्मा आता युअसएमध्ये आपला शो करणार आहे.
युएसएमध्ये त्याचा पहिला शो 8 जुलैला आहे. सर्व शोच्या वेळापत्रकाची माहिती कपिलने सोशल मीडियावरून दिली आहे. याआधीही अनेकदा शो बंद झाला असून पुन्हा नवीन सीझनसोबत कपिल या शोच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या सीझननंतर कपिल शर्मा पुन्हा कधी आपल्या शोमध्ये दिसणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.