
सध्या नो मेकअप लूकचा फारच ट्रेंड आहे. अनेक सेलिब्रिटीही या लुकचे फॅन आहेत. याचविषयी आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.

अनन्या पांडेचा हा नो मेकअप लूक करण्यासाठी आधी फाउंडेशन लावा. नंतर ओठांवर आणि गालावर लिक्विड लिप ग्लोस आणि चीक टिंट लावा.

शेवटी मस्करा लावा. मेसी हेअरस्टाईल (थोडे अस्ताव्यस्त केस) अंबाडा किंवा पोनीटेल हेअरस्टाइल या लूकसह उत्तम ठरेल.

अनन्याचा हा लूक देखील फारच आकर्षक दिसत यातही तिने न्यूड मेकअप केला आहे.

हा लूक करण्यासाठीही वरील टिप्स फॉलो करा व केस मोकळे ठेवा.

अभिनेत्री आलिया भट्ट देखाील अनेकदा असे लूक करताना दिसते.

आलिया भट्टचा क्यूट लुक ट्राय करण्यासाठी, प्रथम फाउंडेशन लावा, नंतर ब्राऊन आय लाइनर लावा, शेवटी लिप ग्लॉस लावा. या लुकसह केस मोकळे सोडा किंवा सेंटर पार्टिंगजवळ तीन सीझ लहान करा.







