फोटो सौजन्य: सोशल मीडिया
२०१६ साली रिलीज झालेला रोमँटिक हिंदी चित्रपट ‘सनम तेरी कसम’ (Sanam Teri Kasam) आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane)आणि मावरा हुकेन (Mawra Hocane)यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. रि- रिलीज झालेला ‘सनम तेरी कसम’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. ९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, ‘सनम तेरी कसम’चे दिग्दर्शक राधिका राव आणि विनय सप्रू चित्रपटाला मिळत असलेल्या यशाचा आनंद सेलिब्रेट करत आहे. अलीकडेच, त्यांनी टीव्ही ९ हिंदी डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी ‘सनम तेरी कसम’च्या सक्सेसपासून ते ‘सनम तेरी कसम २’पर्यंत अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
Ranveer Allahbadia चा सुप्रीम कोर्टाकडून पासपोर्ट जप्त, FIR बद्दल केले महत्वपूर्ण विधान
विनय सप्रू आणि राधिका रावने चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगितले की, “जेव्हा आम्ही इंदर आणि सरूची कथा लिहित होतो तेव्हा आम्हाला माहित होते की या दोघांची कथा फक्त एका चित्रपटापुरती मर्यादित नाही. आम्ही त्यावेळी चित्रपटाचा भाग २ देखील लिहिला होता. आम्हाला खात्री होती की, हा चित्रपट हिट होईल, पण जेव्हा तो फ्लॉप झाला तेव्हा आम्ही त्यावर काम करणे थांबवले. पण आम्ही इंदर आणि सरूवर ‘लव्ह सागा’ नावाचा चित्रपट लिहिला. त्यांचे दोघांचेही स्वतःचे एक वेगळे जग आहे, ते फक्त एका चित्रपटापुरती मर्यादित नाही. आता प्रेक्षकांनी ‘सनम तेरी कसम’ चित्रपटावर इतके प्रेम केल्यामुळे, ‘सनम तेरी कसम २’ वर काम करण्याची आमची आवड आणखी वाढली आहे.”
‘प्रेमाची शिट्टी’लंडनमध्ये वाजली… रोमँटिक गाण्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा
‘सनम तेरी कसम’ चित्रपटात अभिनेत्री मावरा हुकेनने एका हिंदू मुलीची भूमिका साकारली होती. हर्षवर्धन राणेची आणि मावरा हुकेनची जोडी प्रेक्षकांना फार आवडली. पण आता मावरा हुकेन ‘सनम तेरी कसम २’ चा भाग असेल का? या मोठ्या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांसाठी अजूनही अनुत्तरितच आहे. खरं तर, गेल्या अनेक वर्षांपासून ‘इंडियन प्रोड्यूसर गिल्ड’ने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली आहे. पण दोन वर्षांपूर्वी, भारतात पाकिस्तानी कलाकारांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. तथापि, ‘बॉयकॉट बॉलिवूड’ सारखे ट्रेंड पाहून, कोणताही निर्माता पाकिस्तानी कलाकारांना कास्ट करण्यास फारसा रस दाखवत नाही.
आजही विनय सप्रू आणि राधिका राव पाकिस्तानी अभिनेत्री मावरा हुकेनच्या संपर्कात आहेत. त्यांच्या मनात पाकिस्तानी अभिनेत्रीबद्दल आजही आपुलकी, आदर आणि प्रेम आहे. पण पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या दुसऱ्या बाजूचाही ते आदर करतात. याबद्दल बोलताना ते म्हणाले, “हे पहा, हे असे प्रकरण आहे की, ज्यांनी हा निर्णय घेतला आहे, त्यांच्याकडे अनेक कारणे असतील आणि ती योग्य कारणं असतील. जर कोणतेही अधिकार अशी भूमिका घेत असतील तर ते योग्यच असेल. आम्ही याबद्दल काहीही बोलू शकत नाही. आम्ही एक क्रिएटिव कम्युनिटी आहोत, आम्हाला जगभरातील सर्वांसोबत काम करायचे आहे. पण आपल्या देशात काही नियम आहेत. जर सरकारने कोणताही निर्णय घेतला तर तो देशाच्या हिताचाच असतो. सरकार आपल्या देशासाठी निर्णय घेते आणि आपण त्या निर्णयाचा आदर केला पाहिजे.”