आपल्या अतरंगी फॅशन सेन्समुळे कायम खळबळ माजवणाऱ्या उर्फी जावेद (Urfi javed) सोशल मीडियावर नेहमीचं चर्चेत असते. तिच्या विचित्र कपड्यांमुळे ती नेहमीच ट्रोल होते पण ट्रोलर्सला ती न जुमानता तिला हवं तसं ती वागते. आता पुन्हा ती चर्चेत आली आहे. तर तिच्या फॅशन सेन्समुळे नाही तर तर बॅालिवुडमध्ये एन्ट्रीमुळे. होय, नेहमी अतरंगी कपड्यांमुळे सोशल मिडीयावर दिसणारी उर्फी आता लवकरच रुपेरू पडद्यावर झळकणार आहे. उर्फी जावेदचं नशीब फळफळलं असून आता ती थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.
[read_also content=”कार्तिक आर्यननं खरेदी केली कोट्यावधीची आलिशान कार, मजेशीर फोटो चाहत्यांसोबत केला शेअर ! https://www.navarashtra.com/latest-news/bhool-bhulaiyaa-3-actor-kartik-aaryan-buys-luxurious-car-worth-6-crore-rupee-shares-cute-pic-with-pet-katori-nrps-515487.html”]ट
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद दिबाकर बॅनर्जी यांच्या आगामी ‘एलएसडी 2’ (‘LSD 2’ ) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ‘एलएसडी 2′ चित्रपटात इंटरनेट जगतातील प्रेमाची कथा आहे. सोशल मीडियाचा मोठा प्रभाव असलेल्या भवतालामध्ये प्रेम आणि नातेसंबंध दर्शवणारी एक इरोटिक ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात उर्फीची महत्त्वाची भूमिका असणार आहे.’एलएसडी 2’ हा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एलएसडी’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे.
बालाजी मोशन पिक्चर्स आणि कल्ट मुव्हीजच्या बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटात निमृत कौर अहलुवालिया मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार होती. अभिनेत्रीने चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली होती. पण चित्रपटात अधिक प्रमाणात इंटिमेट सीन्स असल्याने चित्रपट सोडल्याचं वृत्त समोर येत आहे.






