वैष्णवीच्या अंगावर तब्बल 29 मारहाणीचे व्रण
पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. हुंडाबळी आणि घरगुती हिंसाचाराची बळी ठरलेल्या वैष्णवीला तिच्या सासरच्या लोकांनी मारहाण केली. या प्रकरणी संपूर्ण हगवणे कुटुंबाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. वैष्णवीच्या मृत्यूनंतर सामान्य नागरिकांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
या प्रकरणावर महाराष्ट्राच्या राजकारणातून रोज वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना मराठी सेलिब्रिटीही आता प्रतिक्रिया देताना दिसत आहे. अभिनेता अस्ताद काळे, अभिनेता पुष्कर जोग, अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिल्पा शिरोडकर आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह, पोस्ट शेअर करत म्हणाली…
अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने त्याच्या एक्स अकाउंटवर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पोस्ट लिहून संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की, “वैष्णवी कस्पटे (मुळ नाव) आणि तेच वापरावं! ज्या आडनावाने तिचा बळी घेतला ते नकोच! या आपल्या बहिणीचा आजच्या काळात हुंडाबळी गेलाय! गेली अनेक वर्ष तिचा छळ झालांय… आणि त्या आईबापांचा देखील… लवकरात लवकर कठीण कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे आपल्या महाराष्ट्रात तरी अशा घटना होऊ नयेत म्हणून आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे.” अशी पोस्ट लिहून अभिनेत्याने या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग केलेली आहे.
वैष्णवी कस्पटे (मुळ नाव) आणि तेच वापरावं! ज्या आडनावाने तिचा बळी घेतला ते नकोच!
या आपल्या बहिणीचा आजच्या काळात हुंडाबळी गेलाय! गेली अनेक वर्ष तिचा छळ झालांय…
चूक दोन्ही बाजूची आहे… सासरकडच्यांची आणि हुंडा देणाऱ्या आईबापाची सुद्धा!
लवकरात लवकर कठीण कारवाई झाली पाहिजे आणि…
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) May 22, 2025
प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन; भावूक पोस्ट शेअर
शिवाय, अभिनेता अस्ताद काळे यानेही वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी फेसबूकवर पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, “संपूर्ण कुटुंबाला जनतेच्या… विशेषत: स्त्रीयांच्या हवाली करायला हवं… हुंडा मागणाऱ्या हलकटांच्या मनात दहशत बसली पाहिजे… कायदा हा माणसांसाठी असतो… हैवानांसाठी नाही.” तर आणखी एक पोस्ट शेअर करत अभिनेत्याने आपला रोष व्यक्त केला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता म्हणतो की, “आपल्या मुलींच्या अवस्थेबद्दल, परिस्थितीबद्दल आई-वडिलांना किंवा घरच्या इतरांना काहीच माहित नसतं? की माहित असूनही हे कोणी पाठिंबा देत नाहीत?? तसं असेल तर हे ‘माहेरचे’ देखील तेवढेच दोषी आहेत ना?? ”
वैष्णवी हगवणे प्रकरणावर अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर जोग याने इन्स्टा स्टोरी शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. त्याने हगवणे कुटुंबीयांना शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये अभिनेता पुष्कर जोग म्हणतो, “खूप लाज वाटते… जे काही महाराष्ट्रामध्ये घडतंय… आधी स्वारगेट प्रकरण आता वैष्णवी… आपल्या भगिनी सुरक्षित आहेत का? एका मुलीचा बाप म्हणून भीती वाटते आता… पोस्ट टाकली की कोणीतरी ट्रोल करतंच… पण, आता गप्प बसून चालणार नाही ना… माणुसकी आणि आपल्या समाजातील निरागस भगिनींचा प्रश्न आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या. Justice For Vaishnavi” असं पुष्कर जोगने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पोस्टच्या शेवटच्या भागात त्याने ‘जोगबोलणार’ असं म्हटलंय.