Vicky Kaushal’s Chhaava Crosses Rs 600 Crore Mark, Father Sham Kaushal Thanks Fans For All The Love
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये अजूनही क्रेझ पाहायला मिळत आहे. १४ फेब्रुवारीला बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला हा चित्रपट ओटीटीवरही गेल्या काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर अनेक कोट्यवधींची उड्डाणे घेतल्यानंतर आता ओटीटीवरही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. २०२५ या वर्षातील सर्वाधिक कमाई केलेल्या चित्रपटांच्या यादीमध्ये ‘छावा’ चित्रपटाचा समावेश झाला आहे. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता फक्त विकी कौशलच नाही तर, त्याच्या घरातल्यांनाही आनंद झाला आहे. विकी कौशलचे वडील आणि प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर शाम कौशल हे लेकाच्या चित्रपटाचं यश पाहून भारावले.
‘मी रागात मर्यादा विसरलो…’, आक्षेपार्ह जातीयवादी टिप्पणीनंतर अनुराग कश्यपने मागितली माफी!
विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड नफा मिळवला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बनवलेल्या या चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि चित्रपटाला एका नव्या उंचीवर नेलं. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाने देशभरात ६०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर जगभरात चित्रपटाने ८०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. विकी कौशलचे वडील शाम कौशल हे लेकाच्या चित्रपटाचं यश पाहून भारावले आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर चित्रपटाचं पोस्टर शेअर करत आपल्या लेकाचं कौतुक केलं आहे. ‘छावा’ चित्रपट हा सर्वाधिक कमाई करणारा देशातला तिसरा चित्रपट ठरला आहे.
प्रेमाच्या गुलकंदाची चव चाखवणाऱ्या ‘गुलकंद’चे टायटल साँग रिलीज…
शाम कौशल यांनी ‘छावा’ चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टवर “६०० नॉट आऊट, ऑल टाइम ब्लॉक बस्टर. ‘पुष्पा २ हिंदी’, ‘स्त्री २’नंतर सर्वाधिक कमाई करणारा ‘छावा’ हा तिसरा चित्रपट ठरला”, असं लिहलेलं आहे. तर यासोबत शाम यांनी कॅप्शनमध्ये “इतके प्रेम दिल्याबद्दल देवाचे आणि सर्वांचे आभार”, असं म्हटलं. शाम कौशल यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. प्रसिद्ध चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी शेअर केलेला पोस्टर शाम कौशल यांनी शेअर केलेला आहे. सध्या विकी कौशलच्या प्रसिद्धीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या चित्रपटानंतर अभिनेत्याकडचा कामाचा कल सध्या वाढत आहे. ‘पुष्पा २’ आणि ‘स्त्री २’ नंतर भारतात हा टप्पा गाठणारा हा तिसरा हिंदी चित्रपट ठरला आहे. तर जगभरात ८०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
“मतांसाठी ५०० रुपये घेणाऱ्यांनी मला धर्म शिकवू नये…”, म्हणणाऱ्या ट्रोलरची शालूने केली कान उघडणी
‘छावा’ चित्रपट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच पसंदीस आला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘छावा’ चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक केलं. गेल्या काही दिवसांपूर्वी संसदेत ‘छावा’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे इतर मंत्री आणि संसदेतील इतर राजकीय व्यक्तीही सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनीच चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं. विकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, ‘छावा’च्या प्रचंड यशानंतर आता विकी संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्यासोबत दिसणार आहे. हा चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार असून हा चित्रपट यशच्या ‘टॉक्सिक’ सोबत बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. याशिवाय, विक्की ‘महावतार’ मध्ये देखील दिसणार आहे, जो अमर कौशिक दिग्दर्शित करत आहे. हा चित्रपट पौराणिक कथा आणि आधुनिक कथेचा एक अनोखा मिलाप असेल, अशी माहिती आहे.