'पुष्पा २' सर्वांपर्यंत पोहोचणार, दिव्यांगांसाठी केलीये निर्मात्यांनी 'अशी' व्यवस्था
गेल्या अनेक दिवसांपासून चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते, अखेर तो क्षण येऊन ठेपला. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा बहुचर्चित ‘पुष्पा २’चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रत्येक जणाने हा चित्रपट पाहावा असं, निर्मात्यांना वाटत असल्याने त्यांनी प्रेक्षकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिव्यांगांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे. ‘पुष्पा २च्या निर्मात्यांनी चित्रपट ज्यांना पाहता येत नाही आणि ऐकता येत नाही, अशा लोकांनाही चित्रपट दाखवण्याची व्यवस्था केली आहे.
“प्रियंकापेक्षा चांगली भूमिका मी…”, ईशा कोप्पिकर स्पष्टच बोलली
‘पुष्पा २’ची क्रेझ लोकांमध्ये जबरदस्त पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाच्या सिक्वेलची वाट चाहते गेल्या अनेक दिवसांपासून पाहत होते. आता हा चित्रपट ५ डिसेंबरला अर्थात आज हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. चित्रपटाच्या गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. अलीकडेच निर्मात्यांनी एक घोषणा करून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘पुष्पा २’च्या निर्मात्यांनी ही घोषणा ज्यांना पाहता येत नाही आणि ऐकता येत नाही, अशा लोकांसाठी केली आहे. त्यांनी ही या चित्रपटाचा आनंद घ्यावा यासाठी निर्मात्यांनी वेगळी योजना आखली आहे.
निर्मात्यांनी अलीकडेच ‘पुष्पा 2: द रुल’च्या सोशल मीडिया पेजवरून माहिती दिली की, “सर्वांनी आनंद घ्यावा असा भारतीय चित्रपट, ‘पुष्पा २: द रुल’ ५ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. ज्यांना पाहता येत नाही आणि ऐकता येत नाही, अशा प्रेक्षकांनाही आता हा चित्रपट पाहता येणार आहे. ग्रेटा आणि मूव्हीबफ ऍक्सेस ॲप्सवर ऑडिओ ॲक्सेस आणि क्लोज कॅप्शनसह चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चित्रपटाच्या माध्यमातून पुष्पा प्रत्येक चाहत्याच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. ”
दिव्यांगांनी चित्रपट कसा पाहायचा ?
या घोषणेने ‘पुष्पा २’च्या निर्मात्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. निर्मात्यांनी पोस्टमध्ये हे देखील सांगितले आहे की दिव्यांग या वैशिष्ट्याचा कसा फायदा घेऊ शकतात. ऑडियो डिटेल आणि क्लोज कॅप्शन चित्रपट पाहण्यासाठी, Greta आणि MovieBuff Access ॲप्सपैकी कोणतेही डाउनलोड करा. यानंतर तुमच्या मेल आयडीने लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर, तुम्ही चित्रपटांच्या यादीतून ‘पुष्पा-2: द रुल’ निवडून आरामात चित्रपट पाहू किंवा ऐकू शकता.