फोटो सौजन्य – X (JioHotstar Reality)
बिग बाॅस 19 ला आता सुरु व्हायला फक्त 10 दिवस शिल्लक राहिले आहेत. या नव्या सिझनमध्ये कोणते नवे स्पर्धक सहभागी होणार आहेत याकडे सर्वाच्या नजरा टिकुन आहेत. सलमान खान पुन्हा एकदा त्याच्या होस्टच्या रुपामध्ये पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस सीझन १९’ चा नवीन अधिकृत प्रोमो समोर आला आहे. सलमान खानने आता शोच्या २ स्पर्धकांचे चेहरे उघड केले आहेत. यावेळी प्रोमोमध्ये स्पर्धकांची फक्त झलक दाखवण्यात आली नाही तर त्यांचे पूर्ण चेहरे दाखवण्यात आले आहेत. शोमध्ये एक मोठा ट्विस्ट आला आहे.
आतापर्यंत चाहत्यांना फक्त ग्रँड प्रीमियरमध्येच ‘बिग बॉस’मध्ये कोण प्रवेश करत आहे हे कळायचे. तथापि, यावेळी जनता स्वतः स्पर्धकांची निवड करेल. म्हणजेच ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांच्या प्रवेशाचा निर्णय चाहत्यांच्या हातात असणार आहे. आता सलमान खान नवीन प्रोमोमध्ये सलमान खान म्हणाला की, यावेळी ‘बिग बॉस’ घराचा खेळ बदलताना दिसणार आहे. यावेळी तुम्ही (Audience) या घरात जाणाऱ्या स्पर्धकांपैकी एकाची निवड कराल.
सलमान खानने सांगितले आहे की आता लोकांना जिओहॉटस्टार अॅपवर जाऊन मतदान करावे लागेल आणि दिलेल्या २ पर्यायांपैकी नवीन गेम चेंजर कोण बनेल हे ठरवावे लागेल? शो सुरु व्हायला 10 दिवस शिल्लक असताना २ स्पर्धकांचे चेहरे उघड केले आहेत. पहिले नाव शहनाज गिलचा भाऊ शेहबाज बदेशाचे आहे. दुसरा स्पर्धक लोकप्रिय युट्यूबर मृदुल तिवारी आहे. आता या दोघांपैकी कोण ‘बिग बॉस’च्या घरात कोण प्रवेश करेल? प्रेक्षक त्यांच्या मतांच्या आधारे निर्णय घेणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, जिओहॉटस्टार अॅपवरही मतदानाची वोटिंग सुरू झाली आहे.
आता चाहत्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. हा नवीन प्रोमो पाहिल्यानंतर चाहते उत्साहित झाले आहेत. आतापर्यंत चाहत्यांना फक्त त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना मतदान करण्याचा आणि त्यांना शोमध्ये ठेवण्याचा अधिकार होता. तथापि, आता जनता त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना देखील या शोमध्ये प्रवेश मिळवून देऊ शकते.
Kaun banega Bigg Boss 19 ke ghar ka sadasya? Ab hoga #FansKaFaisla🫵
Vote karo #JioHotstar app par! @BeingSalmanKhan @danubeprop @CitroenIndia @THEMRIDUL7 @ShehbazBadesha #shehbazbadesha #mridultiwari #BiggBossOnJioHotstar#BB19OnJioHotstar pic.twitter.com/XcvBR83596
— JioHotstar Reality (@HotstarReality) August 14, 2025
या मतदान लाईन्स किती काळ खुल्या राहतील याबद्दल कोणतीही माहिती नाही. वोटिंग लाईन्स बंद होण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या आवडत्या स्पर्धकांना वोटिंग करू शकता. आता निर्मात्यांनी या शोमध्ये कास्टिंगची जबाबदारी जनतेवर सोपवली आहे. यावेळी निर्मात्यांनी पूर्ण तयारी केली आहे की ते बॅकफूटवर राहतील. सध्या मतदान सुरू झाल्याने, शो सुरू होण्यापूर्वीच चाहत्यांची गर्दी वाढली आहे.