अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidhharth Malhotra) त्याच्या बहुप्रतिक्षित ‘योद्धा’ चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर दुबईमध्ये १३ हजार फूट उंचीवरून लाँच करण्यात आले. आता निर्मात्यांनी दमदार ॲक्शन सिक्वेन्ससह चित्रपटाचा टीझर (Yodha Teaser) रिलीज केला आहे. सिद्धार्थ मल्होत्राने हा टीझर त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘आम्ही फ्लाइट घेतली आहे… तुम्ही सर्वजण या हाय-ऑक्टेन ॲक्शनसाठी तयार व्हा…’
[read_also content=”वरुण धवन आणि नताशाच्या घरी हलणार पाळणा, फोटो शेअर करून दिली गोड बातमी! https://www.navarashtra.com/movies/varun-dhawan-natasha-dalal-announce-pregnancy-actor-kisses-wifes-baby-bump-in-heartwarming-photo-508485.html”]
शेरशाह नंतर आता सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा आर्मी ऑफिसरची भूमिका साकारताना दिसत आहे, जिथे तो आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. चाहत्यांना त्याचा हा डॅशिंग अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे. या टीझरलाही प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
या चित्रपटात दिशा सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भुमिकेत आहे. तर अभिनेत्री दिशा पटानीही पहिल्यांदाच सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या दोघांशिवाय राशी खन्ना देखील योधामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 15 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.