आजच्या बिघडलेल्या जीवनशैलीत, अनेक आजारांनी लोक ग्रस्त आहेत. या समस्यांपैकी एक म्हणजे झोपेचा अभाव. जर तुम्हालाही निद्रानाशाच्या समस्येने त्रास होत असेल, तर आज आम्ही तुम्हाला एका खास ४-७-८ तंत्राबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत करेल. चला जाणून घेऊया काय आहे नक्की हे सिक्रेट टेक्निक काय आहे आणि त्याचा कसा वापर करावा. ज्यामुळे तुमची अनिद्रेची समस्या दूर होण्यास मदत मिळते (फोटो सौजन्य - iStock)
जीवनात चांगल्या आहारासोबतच, इतर प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप घेणे जेणेकरून दिवसभराच्या धावपळीचा सर्व थकवा दूर होईल.
प्रत्येकाला रात्रीची चांगली झोप हवी असते जेणेकरून ते दुसऱ्या दिवसासाठी उर्जेने तयार राहतील. पण हल्ली ही झोप मिळतच नाहीये, त्यासाठी काय करावे
निद्रानाशाच्या समस्येवर मात करण्यासाठी, तुम्ही ४-७-८ श्वास घेण्याचे तंत्र वापरू शकता. ज्यांना झोप येत नाही त्यांच्यासाठी ही पद्धत खूप फायदेशीर ठरू शकते. ही पद्धत काय आहे माहीत आहे का?
जर तुम्ही व्हिज्युअलायझेशन आणि ध्यान एकत्र केले तर ते तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत करू शकते. ४-७-८ ही पद्धत खूप प्रभावी मानली जाते
यामध्ये, तुम्हाला ४ सेकंद नाकातून श्वास घ्यावा लागेल, नंतर ७ सेकंद श्वास रोखून ठेवावा लागेल आणि पुन्हा ८ सेकंद तोंडातून हळूहळू श्वास सोडावा लागेल. हे करण्यासाठी, खाली बसा, नंतर जिभेचे टोक पुढच्या दातांच्या अगदी मागे ठेवा आणि प्रक्रिया सुरू करा
हे श्वास घेण्याचे टेक्निक चिंता कमी करते आणि मज्जासंस्था शांत करण्यास मदत करते. शिवाय, ते तुमच्या झोपेची गुणवत्तादेखील सुधारते आणि रात्री तुम्हाला शांत झोप लागते