• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Rahul Shewale Launched A Scathing Attack On Thackerays Manifesto

वचननाम्यातून मराठी माणूस आणि हिंदुत्व गायब… राहुल शेवाळेंची ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर जळजळीत टीका

Maharashtra Politics News: उबाठा आणि मनसेच्या संयुक्त वचननाम्यातून 'हिंदुत्व' आणि 'मराठी माणूस' हे शब्द गायब झाल्याचा आरोप करत राहुल शेवाळे यांनी घणाघाती टीका केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: जानेवारी 04, 2026 | 07:45 PM
राहुल शेवाळेंची ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर जळजळीत टीका

राहुल शेवाळेंची ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर जळजळीत टीका

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • वचननाम्यातून मराठी माणूस, हिंदू, हिंदुत्व शब्द वगळले
  • मराठीसाठी एक झालेल्या ठाकरेंच्या जाहीरनाम्यात इंग्रजीचाच भडीमार
  • शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांची उबाठावर खरमरीत टीका
Rahul Shewale Press Conference: मराठीसाठी एकत्र आलेल्या उबाठा आणि मनसेनं निवडणूक वचननाम्यात ४० टक्के इंग्रजी शब्दांचा वापर केला. विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी वचननाम्यातून मराठी माणूस, हिंदु, हिंदुत्व, हिंदुह्रदयसम्राट शब्द वगळले, या वचननाम्यावर बॉम्बे स्कॉटिशचा प्रभाव असल्याची घणाघाती टीका शिवसेना सरचिटणीस व माजी खासदार राहुल (Rahul Shewale)  शेवाळे यांनी केली. मराठीऐवजी दुसऱ्या भाषेचा वापर केल्यास खळखट्याक करणारे आता वचननाम्यातून मराठीची गळचेपी करणाऱ्यांना धडा शिकवणार का, असा सवाल शेवाळे यांनी केला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, सहमुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे उपस्थित होते.

राहुल शेवाळेंच्या टीकेचे बाण

शेवाळे म्हणाले की, स्वत:ला हिंदुह्रदयसम्राटांचा वारस समजणाऱ्यांनी विशिष्ट समाजाला खूश करणाऱ्यासाठी वचननाम्यात मराठी, हिंदू, हिंदुत्व, हिंदुह्रदयसम्राट हे शब्द वगळले. वचननाम्यावर बाळासाहेबांचा फोटो आहे पण त्यात आत्मा नाही, अशी घणाघाती टीका शेवाळे यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर आणि सन्मान न करणारा उबाठा मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा हा शिवसैनिकाला आणि मराठी माणसाला वेदना देणारा आहे, असे शेवाळे म्हणाले.

हिंदुहृदयसम्राटांचा अवमान

संपूर्ण वचननाम्यात हिंदुह्रदयसम्राट असा उल्लेख टाळून उबाठाने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षातच अवमान केला आहे, असे शेवाळे म्हणाले. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मुंबईत वैद्यकीय महाविद्याल, कोळीवाड्यांची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय़ का नाही घेतले, असा सवाल शेवाळे यांनी यावेळी उपस्थित केला. आजचा वचननामा म्हणजे बालकांना वाचवायचा पालकांनी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका शेवाळे यांनी केली.

हे देखील वाचा: Uddhav Thackeray Live : देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू…”; उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा

२०१७ वचननाम्यातील मुद्दे पुन्हा कॉपीपेस्ट

मराठी रंगभूमीसाठी दालन, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पालिकेत नोकरी देणे, स्वातंत्र्याची गाथा देणारं स्मृतीदालन, पूर्व उपनगरात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार, मुंबईच्या २४ तास पाणी पुरवठ्यासाठी गारगाई पिंजाळ धरणाचे काम, समुद्राचे पाणी गोडं करण्याचा प्रकल्प अशी आश्वासने २०१७ मधील वचननामामध्ये देण्यात आली होती. ठाकरेंनी २०१७ वचननाम्यातील मुद्दे पुन्हा कॉपीपेस्ट करुन इंग्रजी भाषेत सादर केले, असा टोला शेवाळे यांनी लगावला.

शिवसेनेचा आगामी ‘मराठी’ संकल्प

शिवसेना मराठी माणूस, हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलायला घाबरत नाही. निवडणूक आयोगाने कारवाई करावी, आम्ही घाबरत नाही, असे शेवाळे म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनेकडून पंचवार्षिक कार्यक्रम घोषीत करणार आहोत. यासाठी पुरेसा निधी आणि धोरणात्मक निर्णय़ घेतले जाणार आहेत. मुंबईतील मराठी माणूस, मराठी उद्योजक, मराठी महिलांसाठी अर्थसहाय्य, मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांचे पुनर्वसन करण्यासाठी शिवसेना कार्यक्रम राबवणार आहे, असे शेवाळे म्हणाले.

ठाकरेंचा शब्द भ्रष्टाचाराचा, मतलाबाचा आणि तिजोरी लुटण्याचा

शेवाळे यांनी ‘हा शब्द ठाकरेंचा’ यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की काँग्रेससोबत जाणार नाही, हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही हा बाळासाहेबांचा शब्द होता. बाळासाहेबांचा शब्द हा धनुष्यबाणासारखा होता, एकदा सुटला की आरपार जायचा. मात्र ठाकरेंचा शब्द यूटर्न मारणारा असून तो त्यांच्यावरच उलटणार आहे, अशी टीका शेवाळे यांनी केली. एकमेकांना विश्वासघातकी म्हणणारे, पाठित खंजीर खुपसला म्हणणारे आणि आपलाच शब्द गिळणारे ते आहेत त्यामुळे मुंबईकर जनता ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेवणार नाही, असे शेवाळे म्हणाले. त्यांचा शब्द भ्रष्टाचाराचा, मतलाबाचा आणि तिजोरी लुटण्याचा आहे, अशी खरमरीत टीका शेवाळे यांनी केली. त्यामुळेच त्यांनी वचननाम्यातमध्ये जाणीवपूर्वक हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख टाळला.

हे देखील वाचा: Maharashtra Politics : बंडखोरांना शिवसेनेचा दणका; विरोधात अर्ज भरणाऱ्या 26 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

Web Title: Rahul shewale launched a scathing attack on thackerays manifesto

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: जानेवारी 04, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Maharashtra Local Body Election
  • Maharashtra Politics news
  • MNS
  • rahul shewale
  • Shiv Sena UBT
  • shivsena

संबंधित बातम्या

Panvel News: स्वीकृत नगरसेवकपदावर ‘आर्थिक सौदा’चा संशय? पनवेलमध्ये शिवसेना उबाठा गटात खळबळ
1

Panvel News: स्वीकृत नगरसेवकपदावर ‘आर्थिक सौदा’चा संशय? पनवेलमध्ये शिवसेना उबाठा गटात खळबळ

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन
2

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन

Maharashtra Politics: राज्यात मोठी घडामोड! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ
3

Maharashtra Politics: राज्यात मोठी घडामोड! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Iran Vs USA : कतारमधील अल-उदेद तळ हादरला! 1. अब्ज डॉलर्सच्या ‘THAAD’ रडारची धूळधाण; अमेरिकेचा थयथयाट

Iran Vs USA : कतारमधील अल-उदेद तळ हादरला! 1. अब्ज डॉलर्सच्या ‘THAAD’ रडारची धूळधाण; अमेरिकेचा थयथयाट

Mar 05, 2026 | 02:04 PM
‘नागबंधम’ चित्रपटामधील ‘नमो रे’ गाण्याची घोषणा; १००० डान्सर्स साकारणार भगवान नारायणांच्या भक्तीचे भव्य दृश्य

‘नागबंधम’ चित्रपटामधील ‘नमो रे’ गाण्याची घोषणा; १००० डान्सर्स साकारणार भगवान नारायणांच्या भक्तीचे भव्य दृश्य

Mar 05, 2026 | 02:04 PM
Bangalore crime: बंगळुरूमध्ये हुंड्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरचा छळ; महिलेने उचलले टोकाचे पाऊल

Bangalore crime: बंगळुरूमध्ये हुंड्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरचा छळ; महिलेने उचलले टोकाचे पाऊल

Mar 05, 2026 | 02:02 PM
Karjat News : ठेकेदारांची मुजोरी; रस्त्याच्या कामाकडे प्रशासानाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आरोप

Karjat News : ठेकेदारांची मुजोरी; रस्त्याच्या कामाकडे प्रशासानाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आरोप

Mar 05, 2026 | 02:00 PM
The Taj Story OTT Release Date : परेश रावल यांचा ‘द ताज स्टोरी’ चित्रपट OTT वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार?

The Taj Story OTT Release Date : परेश रावल यांचा ‘द ताज स्टोरी’ चित्रपट OTT वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार?

Mar 05, 2026 | 01:58 PM
Arjun Tendulkar Wedding : अर्जुन आणि सानियाचा विवाह सोहळा पडला पार! लग्न झाल्यानंतर दोघांनी मारली मिठी, Video Viral

Arjun Tendulkar Wedding : अर्जुन आणि सानियाचा विवाह सोहळा पडला पार! लग्न झाल्यानंतर दोघांनी मारली मिठी, Video Viral

Mar 05, 2026 | 01:52 PM
Bhooth Bangla: सेमीफायनलपूर्वी अक्षय कुमारने टीम इंडियाला दिल्या खास ‘शुभेच्छा’, क्रिकेटर शिखर धवनला दिली टक्कर

Bhooth Bangla: सेमीफायनलपूर्वी अक्षय कुमारने टीम इंडियाला दिल्या खास ‘शुभेच्छा’, क्रिकेटर शिखर धवनला दिली टक्कर

Mar 05, 2026 | 01:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.