महाराष्ट्रामध्ये आज पाचव्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. या पाचव्या टप्प्यात 13 जागांवर मतदान सुरु आहे. आपला मतदानाचा हक्क अनेक बॉलीवूड कलाकार त्याचबरोबर राजकीय पक्ष आणि भारतीय खेळाडू मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले आहे. त्याचबरोबर अनेक भारतीय क्रिकेट खेळाडूंनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावून त्यांनी त्याच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरपासून सूर्यकुमार यादवपर्यंत अनेक क्रिकेटपटू मतदान करताना दिसले.
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने त्यांच्या मुलगा अर्जुन तेंडुलकर सोबत मतदानाचा अधिकार पूर्ण केला. या दोघांचा मतदानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी सुद्धा त्यांच्या पत्नीसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानानंतर त्यांनी आपला फोटो शेअर केला, ज्यामध्ये त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी मत द्या, जय हिंद.
भारताचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने सुद्धा सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे आणि त्याने त्याच्या पत्नीसोबत मतदानाचा हक्क सुद्धा बजावला आहे. लवकरच सूर्यकुमार यादव T-२० वर्ल्डकपमध्ये दिसणार आहे.
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आयपीएल 2024 मधून मुक्त झाल्यानंतर त्याच्या घरी पोहोचला, जिथे त्याने आपले मत दिले आणि फोटो शेअर केला आणि लिहिले, आम्ही आमचे कर्तव्य केले, तुम्हीही ते केले का? यावेळी रहाणेसोबत त्याची पत्नीही दिसली.